ताज्या बातम्याराजकारण

अब होगी आर या पार की लढाई, मोहिते पाटील समर्थकांची आक्रमक भूमिका…

भैय्यासाहेब तुम्ही सांगाल ते धोरण, बांधाल ते तोरण कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय…

अकलूज (बारामती झटका)

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून जाहीर झाल्यानंतर लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते. मात्र, मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर अब होगी आर या पार की लढाई, अशी मोहिते पाटील समर्थकांची आक्रमक भूमिका राहिलेली आहे. भैय्यासाहेब तुम्ही सांगाल ते धोरण, बांधाल ते तोरण, अशा वेगवेगळ्या पोस्ट करून कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे लवकरच शिवरत्न बंगला येथे कार्यकर्त्यांची चिंतन बैठक होऊन पुढील रणनीती ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे.

मोहिते पाटील परिवारातील सदस्यांनी लोकसभेच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पक्षामध्ये मुंबई येथे जाऊन प्रवेश केलेला होता. त्यानंतर लोकसभेची निवडणूक झालेली होती. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिलेली होती. त्यावेळेस रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातून एक लाखापेक्षा जास्त लीड मोहिते पाटील यांच्यामुळेच मिळाले होते, असे मोहिते पाटील समर्थक यांच्यामधून बोलले जात होते. विधानसभेच्या निवडणुकीत राम सातपुते यांचा विजय झालेला होता. त्यामध्येही मोहिते पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे कार्यकर्ते सांगत होते. माढा लोकसभा व माळशिरस विधानसभा मोहिते पाटील यांच्या सहकार्याने भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात पहिल्यांदा आलेले असल्याने भारतीय जनता पक्षाने रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेचे आमदार केलेले होते. भारतीय जनता पक्षाने माळशिरस विधानसभेची जबाबदारी धैर्यशील मोहिते पाटील व माढा विधानसभेची जबाबदारी रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्याकडे दिलेली होती. मोहिते पाटील यांनी शिफारस केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदाच्या निवडी केलेल्या आहेत. माळशिरस तालुक्यातील सर्व वाॅरियर्स व बूथ यंत्रणा ताब्यात दिलेली आहे. भारतीय जनता पक्षाने मोहिते पाटील यांचा योग्य सन्मान केलेला होता. असे असताना मोहिते पाटील व समर्थक यांच्याकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्यावर एकेरी व पक्षविरोधी सोशल मीडियावर सुरू होते‌. अशामध्येच धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभेसाठी इच्छुक झालेले होते. खासदारच अशा पद्धतीने डिजिटल व सोशल मीडियावर सुरू होते. भारतीय जनता पक्षावर दबाव टाकण्याच्या उद्देशाने दरम्यानच्या काळामध्ये विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या.

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी माढा लोकसभा मतदारसंघात आल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव करीत होते. त्यावेळेसही मोहिते पाटील समर्थक त्यांची खिल्ली उडवत होते. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देवो अथवा न देवो मोहिते पाटीलच खासदार असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतलेला होता.

सध्या भाजपने उमेदवारी डावलली असल्याने मोहिते पाटील समर्थक आक्रमक झालेले आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळ्या कमेंट टाकून माढा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाडा अशा सुद्धा कमेंट समाज माध्यमातून समोर येत आहेत. मोहिते पाटील परिवारातील सदस्यांनी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार व सुप्रियाताई सुळे यांच्याशी गोपनीय बैठका झाल्या असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. असे असताना प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की, धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपने उमेदवारी डावलल्यानंतर राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल का ? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर जयंतराव पाटील यांनी खोचक उत्तर देऊन मोहिते पाटील यांना डावलले होते. त्यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी सुद्धा मिळणे मुश्किल वाटत आहे. शेवटी निवडणूकच लढवायची असेल तर कृष्णा भीमा विकास आघाडी स्थापन केलेली आहे. यामधून माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील उभे राहू शकतात, अशी समर्थकांमधून चर्चा सुरू आहे. खऱ्या अर्थाने आर या पार ची लढाई करावयाची असेल तर मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघात किती मतदारांचा पाठिंबा आहे, यासाठी एकदा उभे राहून अंदाज घेणे गरजेचे आहे.

लोकसभेसाठी खासदारच असे म्हणून म्यानातून काढलेली तलवार पुन्हा जर मॅन केली तर मोहिते पाटील यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल, असे सुद्धा निकटवर्तीय समर्थक यांच्यामधून बोलले जात आहे. शेवटी समर्थक यांना काय वाटते यापेक्षा मोहिते पाटील काय भूमिका घेतील ?, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button