ॲड. अल्ताफ आतार यांची नोटरीपदी (भारत सरकार) निवड
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील ॲड. अल्ताफ बादशाह आतार यांची नोटरीपदी (भारत सरकार) निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ते माळशिरस येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात गेली १९ वर्षापासून वकिली व्यवसाय करीत आहेत.
ॲड. अल्ताफ बादशाह आतार यांचे प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा, निमगाव या ठिकाणी झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण निमगाव विद्यामंदिर निमगाव या ठिकाणी झाले. त्यानंतरचे पदवीपर्यंतचे शिक्षण शंकराव मोहिते पाटील महाविद्यालय, अकलूज या ठिकाणी होऊन एल. एल. बी. चे शिक्षण पुणे येथील यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज येथे पूर्ण करून गेली.
ॲड. अल्ताफ आतार गेली १९ वर्षापासून माळशिरस येथे दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे काम करत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून वकिली व्यवसाय करत असताना सर्वसामान्य, गरीब व होतकरू समाजाला अथवा घटकांना न्याय देण्याचे काम करीत आहे. त्यांनी सामाजिक, राजकीय काम करत असताना २०१० मध्ये माळशिरस वकील संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळ या पॅनलवर काम केले आहे. तसेच शिवामृत दूध उत्पादक संस्थाची सेवकांची पतसंस्था या संस्थेवर काम केलेले आहे.
अशा कर्तुत्ववान ॲड. अल्ताफ आतार यांची नोटरीपदी (भारत सरकार) निवड झाल्याने सर्व वकील बांधवांतून आनंद व्यक्त होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.