“राहून राहून आठवण येते” भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांना बाळदादांच्या वाक्याची.
भाजप व महायुतीचे लोकसभेचे उमेदवार सातारा, बारामती, माढा, सोलापूर पाडण्यास निघालेल्या जयसिंह मोहिते पाटील यांनी मुलाला अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवापासून वाचवू न शिकलेले यांच्या वाक्याची राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच….
अकलूज (बारामती झटका)
भारत देशाच्या अठराव्या लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे. लोकसभेची आचारसंहिता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेली आहे. विविध राजकीय पक्षाकडून उमेदवारी घोषित करण्याचे काम सुरू आहे. देशामध्ये भाजप व महायुती यांच्याकडून लोकसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून देशाचा गतिमान विकास करण्याकरता लोकसभेसाठी तुल्यबळ व खात्रीशीर निवडून येणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजप पक्षाकडून पुनश्च संधी मिळालेली आहे. माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील हेही उमेदवारीसाठी इच्छुक होते मात्र, भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी डावललेली असल्याने मोहिते पाटील परिवारातील सदस्यांचा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व कमळ चिन्हावर रोष वाढलेला आहे. एकीकडे मोहिते पाटील समर्थकांनी कमळ उलटे करून सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाच्या नेते, कार्यकर्ते व ध्येयधोरणावर चिखल फेक करण्याचे काम सुरू आहे. शिवरत्न येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला होता.
सदरच्या ठिकाणी भाजपचे संकट मोचन नामदार गिरीजी महाजन येणार होते. त्यावेळेस सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते व मोहिते पाटील परिवार व कार्यकर्ते ज्यांचा शब्द प्रमाण मानला जातो, असे जयसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना येणाऱ्या निवडणुकीत सातारा, बारामती, माढा, सोलापूर भाजपचे पाडायचे असे वक्तव्य केलेले असल्याने भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांना बाळदादांच्या वाक्याची राहून राहून आठवण येत आहे. कारण भाजप व महायुतीचे लोकसभेचे उमेदवार पाडण्यास निघालेले जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा मुलगा संग्रामसिंह मोहिते पाटील यांना अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवापासून वाचवू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वाक्याची राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच. भाजपसह इतर पक्षात चर्चा सुरू आहे.
काँग्रेसचे युवा नेते राहुलजी गांधी यांचे वडील स्वर्गीय राजीवजी गांधी व आजी इंदिराजी गांधी यांनी पंतप्रधान पदावर काम केलेले असून गांधी घराण्याला राजकारणाचे देशामध्ये थेट वलय असताना राजीव गांधी यांचे सुद्धा राजकारण सीमित करत आणलेले आहे. राज्यात व जिल्ह्यात यांच्या नावाचा वापर करून कोणताही लोकप्रतिनिधी निवडून आलेला नाही. तालुक्यापुरते सीमित राजकारण असणारे मोहिते पाटील यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आव्हान केले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ग्रामपंचायतीला मुलाचा पराभव वाचवू न शकलेले लोकसभेचे चार मतदार संघ कसे पराभूत करणार, असाही प्रश्न उपस्थित करून जर मोहिते पाटील यांची ताकद असेल तर त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या विरोधात घरातील उमेदवार उभा करून निवडून जरी आणला तरी राजकीय ताकतीचा अंदाज येईल. यासाठी उमेदवार उभा करावा अशी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे. माढा लोकसभा मतदार संघात सातारा जिल्ह्यातील फलटण, माण-खटाव व इतर तालुक्यातील गावांच्या समावेशासह सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून पंढरपूर तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्याची भाजपची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व राष्ट्रवादीची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आहे. दुसऱ्या अर्थाने दोन उपमुख्यमंत्र्यांना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू यांनी आव्हान दिलेले आहे. देवेंद्रजी फडवणीस यांनी श्री शंकर सहकारी साखर कारखाना सुरू करण्याकरता 113 कोटी रुपये नियम धाब्यावर बसवून दिलेले आहेत. दुसऱ्या कारखान्याला सुद्धा आर्थिक सहाय्य केलेले आहे. फुकटामध्ये विधान परिषद रणजीतसिंह मोहिते पाटील यांना दिलेली आहे. असे असताना मोहिते पाटील परिवाराचे बंड भारतीय जनता पक्ष थंड डोक्याने स्वीकारणार आहे, अशी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमधून चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Very informative and funny! For those curious to know more, check out: FIND OUT MORE. Let’s discuss!