ताज्या बातम्याराजकारण

शरदचंद्रजी पवार यांचा नवा ट्यूट इतर पक्षातील “थुतार” वर करून आलेल्यांना “तुतारी” हाती देणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रथम प्राधान्य, इतरांची “सुपारी” वाढवून आली तरच त्यांना “तुतारी” वाजवण्याची संधी..

बारामती (बारामती झटका)

लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 48 जागा लोकसभेच्या आहेत. सध्या भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षांची महायुती आहे तर काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व इतर पक्षाची महाविकास आघाडी आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये फुट पडलेले शिवसेनेचे एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांनी सोबत आमदार घेऊन भाजप व मित्र पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी होऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेना व अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतलेला आहे.

देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असा नवीन पक्ष स्थापन केलेला आहे. पक्षाला तुतारी चिन्ह मिळालेले आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटप निश्चित झालेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रथम प्राधान्य देण्यासाठी शरदचंद्रजी पवार यांचा नवा ट्यूट बाहेर आलेला आहे. इतर पक्षातील “थुतार” वर करून आलेल्यांना “तुतारी” सहजासहजी हाती देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रथम प्राधान्य देणार आहे. इतर पक्षातील नव्याने येणाऱ्यांना सुपारी वाढवून आली तरच त्यांना तुतारी वाजवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शरदचंद्रजी पवारांची तुतारी वाजविण्यासाठी टपून बसलेल्या राजकीय नेत्यांची कोंडी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button