युवा कीर्तनकार ह. भ. प. अमोल महाराज सूळ, मोरोची यांचे कण्हेर येथे सुश्राव्य कीर्तन होणार…

पंचायत समिती सदस्य गौतमआबा माने पाटील व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांच्या मातोश्री श्रीमती यशोदा माने पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन…
माळशिरस (बारामती झटका)
कण्हेर ता. माळशिरस, येथील स्वर्गीय श्रीमती यशोदा नामदेव माने पाटील यांच्या सोमवार दि. ०१/०४/२०२४ रोजी प्रथम पुण्यस्मरण निमित्त युवा कीर्तनकार ह. भ. प. अमोल महाराज सूळ, मोरोची यांचे सुश्राव्य कीर्तन सकाळी १० ते १२ या वेळेत होणार असून प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे श्री. श्रीपती नामदेव माने पाटील, श्री. हौसराव नामदेव माने पाटील, श्री. दिलीप नामदेव माने पाटील, श्री. श्रीमंत नामदेव माने पाटील, श्री. उत्तम आबाजी माने पाटील, श्री. गौतमआबा नामदेव माने पाटील, श्री. एकनाथ नामदेव माने पाटील, बाबासाहेब नामदेव माने पाटील व समस्त माने पाटील परिवार, कण्हेर यांच्यावतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
कण्हेर रानमळा येथे वास्तव्यास असणारे यशोदाबाई व नामदेवराव माने पाटील सर्वसामान्य परिस्थितीतील कुटुंब होते. आर्थिक परिस्थिती बेताची, जमीन असूनसुद्धा पाण्यावाचून नापीक, अशा कठीण परिस्थितीत स्वाभिमानाने या दांपत्याने आपल्या दरिद्री संसाराचा स्वर्ग बनवलेला आहे. पूर्वीच्या काळी मुलं ही देवाघरची फुलं अशी समजूत होती. या दांपत्यांना नऊ मुले व तीन मुली असा मोठा परिवार होता. परिस्थिती कठीण व बिकट असतानासुद्धा दोघांनी मुलांना कधीही उणीव भासू दिली नाही. मुलांवर चांगले संस्कार करून प्रतिकूल परिस्थितीत मुलांना शिक्षण, उद्योग, व्यवसायाकडे वळवून आर्थिक परिस्थिती करून घेतलेली आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात कार्यकर्तृत्व व कष्टातून माने पाटील परिवार यांनी आपली राजकीय, सामाजिक, आर्थिक उन्नती करून समाजामध्ये आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.
कण्हेर ग्रामपंचायतमधून गौतमआबा माने पाटील यांनी राजकारणाला सुरुवात केली. लहानपणापासून कुस्तीचा छंद असल्याने संघटन कौशल्य याचा वापर करून कमी वयामध्ये सरपंच पदाची धुरा सांभाळलेली होती. गावाच्या जडणघडणीत गौतमआबांचा सिंहाचा वाटा आहे. माळशिरस पंचायत समितीच्या सदस्य पदावर काम करण्याची संधी गणातील लोकांनी दिलेली होती. त्या संधीचे सोने करून माळशिरस तालुक्याच्या राजकीय पटलावर गौतमआबा माने पाटील यांनी आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. बाबासाहेब माने पाटील यांनीसुद्धा गावच्या उपसरपंच पदाची धुरा सांभाळून राजकारणात प्रवेश केलेला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष पददेखील भूषविलेले आहे. त्यांनीसुद्धा गौतम आबांसारखाच तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचा संच उभा केलेला आहे.

माने पाटील परिवारांमध्ये प्रतिकूल परिस्थितीतून आर्थिक परिस्थिती सुधारून त्यांच्या घरामध्ये कितीतरी गाड्या, बंगले, घरे झालेली आहे. आई-वडिलांच्या दवाखान्यासाठी कायम घरामध्ये एक गाडी उभी असायची. यशोदा आणि नामदेव हे दाम्पत्य आपण केलेल्या कष्टाचे व प्रतिकूल परिस्थितीत हालअपेष्टा भोगल्याचे विसरून गेलेले होते. मुलांनी व नातवांनी माने पाटील घराण्याचे नाव उज्वल केलेले आहे. माने पाटील यांच्या सुखी संसाराला गालबोट लागावे अशा पद्धतीने स्वर्गीय नामदेवराव माने यांचे दुःखद निधन झाल्यानंतर काही महिन्यातच श्रीमती यशोदा माने पाटील यांचे निधन झालेले आहे. बघता बघता एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त माने पाटील परिवार यांच्यावतीने प्रथम पुण्यस्मरण कण्हेर गावातील रानमळा या राहत्या निवासस्थानी किर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे माळशिरस पंचायत समिती सदस्य गौतमआबा माने पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील व समस्त माने पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे. नजरचुकीने घाईगडबडीत आपणांस प्रथम पुण्यस्मरणाचे निमंत्रण हस्ते परहस्ते न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे समस्त माने पाटील परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.