माळशिरस नगरपंचायत हद्दीत जुन्या झाडांची कत्तल, मुख्याधिकाऱ्यांनी दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश !

माळशिरस (बारामती झटका)
उन्हाळ्याच्या झळा तीव्र जाणू लागल्या असताना रस्त्यालगत झाडांच्या सावल्या कुठे मिळतात, याबाबत प्रवासी शोधा शोध करीत आहेत. उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असताना सर्वत्र बेसुमार वृक्षांच्या कत्तली होत आहेत. त्यामध्येच माळशिरस तालुक्यातील नगरपंचायत हद्दीमध्ये वार्ड क्र. १ मधील कमळमळा येथील श्री तुळजा भवानी मंदिर परिसरातील अंदाजे ५० वर्षापूर्वीचे चंकेश्वरा जातीचे जुने व मोठे झाड तसेच भारतीय प्रजातीचे वटवृक्ष व इतर झाडांच्या फांद्या अज्ञात व्यक्तीने तोडल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर ठिकाणी स्वतः माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी जावून सदर घटनेची पाहणी केली. तरी सदर घटनेची गांभिर्याने दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ (प्रकरण-५ (८) नूसार कोणत्याही नागरी क्षेत्रात हा अधिनियम अंमलात आणल्याच्या दिनांकाला व त्या दिनांकानंतर त्यावेळी अंमलात आणलेली कोणतेही रूढी, परिपाठ, करार किंवा कायदा यात काहीही अंतर्भूत असले तरी कोणीही व्यक्ति वृक्ष अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय त्या नागरी क्षेत्रातील कोणत्याही तिच्या स्वतःच्या मालकीच्या किंवा अन्य जमिनीतील झाड तोडणार नाही व तोडण्यास करणीभूत होणार नाही. तरीदेखील माळशिरस नगरपंचायत हद्धीतील झाडांच्या कत्तली होत आहेत. तर संबंधित व्यक्तीवर कारवाई कधी होणार एक झाड वाढण्यासाठी किती वर्ष लागतात. परंतु तोडण्यासाठी काही क्षणाचा अवधी लागतो. वाढत्या तापमानाला रोखण्यासाठी शासन व वृक्षप्रेमी वृक्ष लागवडीवर भर देत आहेत. तर काही लोक वर्षानुवर्ष मानवी जीवनाला साथ देणाऱ्या झाडाच्या कतली करत आहेत. त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमीमधून होत आहे

माळशिरस नगरपंचायत हद्दीमध्ये कर्मचाऱ्यामार्फत आम्हाला माहिती मिळाली की, कमळमळा या ठिकाणी बेसुमार वृक्ष कत्तल होत आहे. त्याबाबत मी स्वतः जाऊन पाहणी केली. व संबंधित तोडलेल्या झाडाचे फोटो घेऊन माळशिरस पोलीस ठाणे या ठिकाणी दिले असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले आहेत. यापुढे माळशिरस नगरपंचायत हद्दीमध्ये स्वतःच्या अथवा सार्वजनिक ठिकाणी वृक्षतोड करताना कोणी आढळून आल्यास संबंधितांवर महाराष्ट्र शासन अधिनियम १९७५ च्या ५ (८) नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यापुढे माळशिरस नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये अतिक्रमण व वृक्षतोड होणार नाही. याबाबत कठोर पावले उचलली जातील. – माधव खांडेकर, मुख्याधिकारी, माळशिरस नगरपंचायत
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.