चि. सौ. कां. अर्चना चोरमले, जळभावी आणि चि. उत्कर्ष काळे, विझोरी यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

प्रेषक – श्री. विजय चोरमले चेअरमन, जय हनुमान दूध संकलन केंद्र जळभावी, श्री. समाधान चोरमले, श्री. बापूराव शिंदे सरपंच, ग्रामपंचायत जळभावी यांच्या वतीने आग्रहाचे आमंत्रण
जळभावी (बारामती झटका)
कै. लक्ष्मण गुंडीबा चोरमले यांची नात व सौ. जगूबाई व श्री. भानुदास लक्ष्मण चोरमले तंटामुक्ती अध्यक्ष जळभावी, रा. जळभावी, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. अर्चना (Electrical Engg.) आणि कै. यशवंत भोजू काळे यांचे नातू व सौ. सुजाता व श्री. गणपत यशवंत काळे, रा. विझोरी, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. उत्कर्ष (Electrical Engg.) यांचा शाही शुभविवाह सोहळा सोमवार दि. १/४/२०२४ रोजी दुपारी १२ वा. ४३ मि. या शुभमुहूर्तावर भगवंत मंगल कार्यालय, सदाशिवनगर नजीक, जाधववाडी रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.
तरी या शाही शुभ विवाह सोहळ्यास वधूवरांना अक्षतारूपी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेषक – श्री. विजय सर्जेराव चोरमले चेअरमन, जय हनुमान दूध संकलन केंद्र जळभावी, श्री. समाधान धुळा चोरमले, श्री. बापूराव दादाराम शिंदे सरपंच, ग्रामपंचायत जळभावी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत, नजरचुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, अशी आग्रहाची विनंती चोरमले परिवार व काळे परिवार यांच्यावतीने करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.