ताज्या बातम्याराजकारण

संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे यांनी स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही भूमिका मांडली आहे.

माढा लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची समर्थकांमधून चर्चा सुरू आहे.

माळशिरस (बारामती झटका)

देशाच्या चौदाव्या लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत. भाजप व महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये महाराष्ट्रात लढत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांमध्ये देशात चर्चेत असलेला माढा लोकसभा मतदार संघात नवीन राजकीय समीकरणे सुरू आहेत. भाजप व महायुतीमध्ये मोहिते पाटील घराण्यातील काही सदस्य आहेत. उमेदवारी वरून राजकारण तापलेले आहे. मोहिते पाटील घराण्यातील भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील भाजपकडून इच्छुक होते मात्र उमेदवारी न मिळाल्याने महाविकास आघाडी मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या गटातून उभा राहण्यासाठी प्रयत्नशील असतानाच संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे यांनी स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही भूमिका मांडली आहे. माढा लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून स्वरूपाराणी यांच्या नावाची समर्थकांमधून चर्चा सुरू आहे.

शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका विजय प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा व सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील उर्फ राणूदिदी यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन माळशिरस तालुक्याचे जेष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण, समाजकारण व संस्थेमधील इतर पदावर उत्कृष्ट प्रकारे काम केलेले आहे. खासदार सुप्रियाताई सुळे आणि स्वरूपाराणी मोहिते पाटील यांची सयाजीराजे वॉटर पार्क अकलूज येथे काही महिन्यापूर्वी भेट झाल्याचीही सोशल मीडियावर चर्चा आहे. बाळदादांच्या मुत्सद्दी व चाणक्य राजकारणात राणूदीदी परीपक्व झालेल्या आहेत.

भाजप व महायुती यांच्याकडून मोहिते पाटील यांना उमेदवारी दिलेली नसल्याने मोहिते पाटील परिवारातील सदस्य अस्वस्थ झालेले आहेत. पुन्हा एकदा शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाऊन तुतारी चिन्ह हाती घेण्याच्या मानसिकतेत आहेत. भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीला अडचण येत असल्याने अजून कोणतीच भूमिका घेतलेली नाही. तुम्ही उभा राहणार नसाल तर मी तयारी करतो, असेही बाळदादांनी सांगितलेले होते. समाज माध्यमासमोर जयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचे बारामती, सातारा, माढा, सोलापूर असे मतदारसंघ पाडणार असल्याचे सांगितलेले होते. लवकरच तुतारी हाती घेणार असल्याचे सुतोवाच केलेले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची यादी जाहीर झालेली आहे. सदरच्या यादीत भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक होते. मात्र उमेदवारी घोषित झालेली नाही. संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे यांनी स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही भूमिका मांडली असल्याचे सुप्रियाताईंच्या समर्थकांमधून बोलले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
13:38