फडतरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची उद्या निवडणूक होणार…

फडतरी (बारामती झटका)
फडतरी ता. माळशिरस, ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती गिरजाबाई दगडू ठोंबरे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला आहे. या रिक्त झालेल्या सरपंच पदाची उद्या शुक्रवार दि. ५/४/२०२४ रोजी दु. २ वा. ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक होणार आहे. सदर निवडणूक प्रक्रिया अध्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी चंद्रशेखर बाळकृष्ण लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
फडतरी/शिवारवस्ती/निटवेवाडी ग्रामपंचायतीत श्रीमती पाटील पुष्पा बापूराव, श्री. आप्पा हनुमंत रूपनवर, श्री. विजय नाना रूपनवर, श्रीमती संगीता अर्जुन होळ, श्रीमती गौरी धनंजय रूपनवर, श्री. दुर्योधन विठ्ठल पाटील, श्री. सागर रोहिदास गुळीग, श्रीमती मनीषा महावीर रूपनवर, श्रीमती प्रियंका बापूराव निटवे, श्रीमती गिरजाबाई दगडू ठोंबरे, श्री. शशिकांत सीताराम नीटवे आदी सदस्य आहेत.
ठरल्याप्रमाणे पहिल्या सरपंचांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडसुद्धा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. परंतु, जर वेळ पडली तर दु. २ वाजण्याचा सुमारास मतदान घेण्यात येईल. यामध्ये नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची वेळ सकाळी ११ ते १२, नामनिर्देशनपत्र छाननीची वेळ सकाळी १२ ते १, उमेदवारी मागे घेण्याची वेळ दुपारी १ ते २ आणि सरपंच पदाची निवडणूक दु. २ वा. होणार आहे. उद्याची निवडणूक बिनविरोध पार पडणार कि, मतदान करावे लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.