भांब येथील संभाजी बाबा भाविकांचे शंभू महादेवाच्या मंदिराला शिखर बांधून कळस चढवायचं ठरलं…

पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हाडाचे उपमुख्य अभियंता श्री. भीमराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ग्रामस्थ भाविकांची बैठक संपन्न झाली…
भांब (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या व सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर शिंगणापूरच्या घाटमाथ्याच्या पायथ्याला स्वयंभू असणारे संभाजी बाबा मंदिर येथील शंभू महादेव मंदिराच्या शिखर बांधून कळस चढवायचं बैठकीत ठरलं आहे.

मंगळवार दिनांक 09/04/2023 रोजी सकाळी अकरा वाजता संभाजी बाबा मंदिरामध्ये मुंबई म्हाडा येथे उपमुख्य अभियंता पदावर कार्यरत असणारे भांब गावचे थोर सुपुत्र श्री. भीमराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ग्रामस्थ भाविकांची बैठक संपन्न झाली. यावेळी किसन महाराज गायकवाड, सरपंच पोपटराव सरगर, पंढरीशेठ काळे, रघुनाथ पांढरे, पोलीस पाटील शंकर ब्रह्मदेव शेंडगे पाटील, अंकुश जगन्नाथ काळे, नाना लक्ष्मण काळे, लक्ष्मण रामा काळे, यशवंत उमाजी काळे, शिवाजी संभाजी काळे, मारुती संभाजी पाटील, धोंडीबा रामचंद्र शेंडगे, दादासो बाबुराव काळे, भानुदास ज्ञानदेव शेंडगे, चोपदार बापूराव रुपनवर, हरी किसन खरात, नितीन बलभीम शेंडगे, अजय रामचंद्र ढवळे, राजाराम अंकुश काळे, सुरेश महादेव काळे, महादेव मारुती काळे, सुरेश कोंडीबा सिद, दत्तू दादा काळे, विजय अंकुश काळे, आप्पा पांडुरंग काळे, नारायण महादेव काळे, रामा किसन पांढरे, संभाजी आप्पा शेंडगे, किसन रामचंद्र शेंडगे, गोविंद रामचंद्र शेंडगे, भीमराव लक्ष्मण काळे, कुंडलिक जगन्नाथ काळे, समीर मधुकर काळे, जब्बर उमाजी काळे, शंकर भिकू काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वयंभू व पावन असणारे संभाजी बाबा मंदिर उपेक्षित राहिलेले होते. भांब गावचे व पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असणाऱ्या मंदिराचा जिर्णोद्धार व मंदिर विकास सुरू आहे. सदरच्या ठिकाणचा सभामंडप लोकवर्गणीतून तयार केलेला आहे. सदरच्या ठिकाणी पेव्हींग ब्लॉक व मंदिराकडे भांबपासून जाणारा अनेक दिवसापासून प्रलंबित असणारा रस्त्याचा प्रश्न सुटलेला आहे. संभाजी बाबा मंदिरासाठी म्हाडाचे उपमुख्य अभियंता भीमराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी बाबा दरा कुस्ती संयोजन समिती मंदिराच्या विकासकामांसाठी धडपडत आहेत. सदरच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रेच्या वेळी कुस्त्यांचे नियोजन केले जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मल्ल व कुस्ती शौकीन येत असतात. संभाजी बाबा यांचे भाविकभक्त अनेक ठिकाणाहून येत असतात.

श्रावण महिन्यामध्ये शंभू महादेवाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. मंदिराच्या ठिकाणी शिखर व कळस असावा, अशी संकल्पना भाविकभक्तांमधून येत आहे. यासाठी म्हाडाचे उपमुख्य अभियंता श्री. भीमराव काळे यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाडव्यानिमित्त शिखर व कळस बांधण्यासाठी बैठकीचे आयोजन केलेले होते. सदरच्या बैठकीला भांब ग्रामस्थ व भांब पंचक्रोशीतील संभाजी बाबा भाविकभक्तांनी उपस्थित रहावे, असे संभाजी बाबा दरा कुस्ती संयोजन समिती भांब यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात आलेले होते. त्याप्रमाणे ग्रामस्थ भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंभू महादेवाच्या मंदिराला लवकरच लोकवर्गणी, भाविक व ग्रामस्थांच्या सहकार्यातून शिखर आणि कळसाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. पहिल्याच बैठकीला ग्रामस्थ व भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभलेला होता. आज पाडव्याचा दिवस असल्याने अनेक जण काही कामानिमित्त बाहेर होते. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शंभू महादेवाच्या व संभाजी बाबांच्या कृपेने योजलेले काम लवकरच पूर्णत्वाकडे जाईल, असा आशावाद उपस्थित ग्रामस्थ व भाविक यांच्यामधून जाणवत होता.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.