शेतकऱ्यांचे दैवत राजू शेट्टी साहेब यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता माळशिरस तालुक्यातून हजारो कार्यकर्ते जाणार – आंदोलनवीर अजितभैया बोरकर

माळशिरस (बारामती झटका)
शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, तरुण व शहरातील सर्वसामान्य जनतेचे व स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार म्हणून आपले सर्वांचे दैवत शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी (साहेब) यांचा दि. 15 एप्रिल 2024 ला हातकणंगले लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी होणाऱ्या रॅलीत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून परिवर्तनाच्या या लढाईत सहभागी व्हावे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजित भैया बोरकर यांनी आवाहन केलेले आहे.
मंगळवार दि. 15 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वा., दसरा चौक, कोल्हापूर येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.