ताज्या बातम्याराजकारण

ब्रेकिंग न्यूज ! राज ठाकरेंचा ‘महायुतीला’ बिनशर्त पाठिंबा

मुंबई (बारामती झटका)

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेचा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीला पाठिंबा असेल पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीच हा पाठिंबा देत असल्याचंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

लोकसभा लढणार नसलो तरी विधानसभेच्या तयारीला लागा, असे राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणाले. देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. जर त्या पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरे आहे. जर खंबीर नेतृत्व असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजप, शिवसेना युतीला नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, असे मी त्यांना सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, पुढचा विचार पुढे, जोरदार कामाला लागा. अजूनही जर समोरच्या लोकांची बकबक झाली तर दार, खिडक्या माझ्या मोकळ्या आहेत, असेही राज ठाकरे म्हणाले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button