उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत माढा व सोलापूर लोकसभेच्या उमेदवारांचा शक्ती प्रदर्शनामध्ये उमेदवारी अर्ज दाखल.

मोहिते पाटील यांचा डिजिटल वरील फोटो “हटला”, माळशिरस तालुक्यासह जिल्ह्याला आनंद “वाटला” म्हणून तर ४६ डिग्री तापमानात जनसागर “लोटला”…
सोलापूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा माढा व सोलापूर लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. मोहिते पाटील यांचा डिजिटल व जाहिरातीवरील फोटो हटला असल्याने माळशिरस तालुक्यासह जिल्ह्यातील नेते कार्यकर्ते व मतदार यांना आनंद वाटलेला आहे. म्हणून तर सोलापूर येथे सूर्यनारायण तळपलेला होता, ४६ डिग्री तापमान असतानासुद्धा महायुतीच्या घटक पक्षातील व संघटनांचे पदाधिकारी, मतदार, शेतकरी बांधव यांचा जनसागर लोटला होता. सोलापूर शहरात मुख्य रस्ते गल्लीबोळात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती संघटना अशा अनेक पक्षांचे व संघटनाचे गमजे गळ्यात, डोकीवर टोपी घातलेले संपूर्ण सोलापूर शहर महायुतीमय झालेले होते.


माढा लोकसभा व माळशिरस विधानसभेमध्ये कमळ फुलण्यासाठी मोहिते पाटील यांच्यासह अनेकांचे योगदान असतानासुद्धा शिवरत्नवरील मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाने सन्मानाची वागणूक दिलेली होती. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना भाजपचे विशेष निमंत्रित सदस्य करून केंद्रीय साखर संघाच्या संचालक पदावर नियुक्त केलेले होते. रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर आमदार केलेले होते, धैर्यशील मोहिते पाटील यांना सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस पद दिलेले होते. विधानसभा निवडणूक प्रमुख रणजितसिंह मोहिते पाटील तर माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुख धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे जबाबदारी दिलेली होती.
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याला आर्थिक मदत करीत असताना निकष डावलून खास बाब म्हणून कोट्यावधी रुपये दिले. अकलूज नगरपरिषदेसह सुचविलेल्या ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा योजना, रस्ते यांना निधी उपलब्ध करून दिला. सर्व काही भाजपने लाड पुरविलेले असताना खासदारकीचा फाजील लाड सुरू झाला. विद्यमान खासदार व भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचे काम सुरू झाले.


कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारसंघातील सिंचन, रेल्वे, रस्ते असे अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करून अनेक प्रश्न मार्गी लावलेले असल्याने केंद्रीय व राज्यातील नेतृत्व यांनी पुनश्च उमेदवारी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर झाल्यानंतर खासदारकीचे स्वप्न पाहणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी थांबणे गरजेचे होते. मात्र, परिवारातील सुप्त इच्छा कार्यकर्त्यांच्या माथी मारून खासदारच होण्यासाठी भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तुतारी हातात घेतलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व महायुती यांनी मोहिते पाटील परिवार यांचा नाद सोडून माढा, सोलापूर, बारामती लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त मताधिक्याने उमेदवार निवडून आणण्याचा चंग भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी बांधलेला आहे. याचाच प्रत्यय सोलापूर येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नेतेमंडळी यांची उपस्थिती प्रामुख्याने होतीच. परंतु, विशेष उपस्थिती आजपर्यंत कधीही उमेदवारी अर्ज न भरण्याकरता आलेले उत्साही नेते, कार्यकर्ते व मतदार पहावयास मिळालेले आहेत.
माळशिरस तालुक्यात लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मतदारसंघात आणलेली विकासाची गंगा व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पिढ्यानपिढ्या दुष्काळात असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निरा देवधर योजना या योजनेत 16 गावे असताना नवीन सोळा गावे समाविष्ट केलेली आहेत. इंग्रज कालीन लोणंद फलटण पंढरपूर रेल्वेचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातून कधीही घर न सोडलेले असे मतदार पहावयास मिळालेले आहेत. निश्चितपणे मोहिते पाटील यांचा डिजिटल वरील फोटो गायब होऊन हटला असल्याने माळशिरस तालुक्यासह जिल्ह्यातील नेते कार्यकर्ते व मतदारांना आनंद वाटला. म्हणून तर ४६ डिग्री तापमान असताना सुद्धा विकासाचं मॉडेल सागर बंगल्यावरून चालवणारे विकासाचे व्हिजन डोक्यामध्ये असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना माढा व सोलापूर दोन्ही खासदारकीचे उमेदवारांच्या विजयाचेच संकेत देणारे नेते, कार्यकर्ते, मतदार, शेतकरी बांधव यांचा जनसागर लोटलेला होता.



नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.