माळशिरस तालुक्यातील ज्येष्ठ नेते व सुप्रसिद्ध निवेदक एन. डी. पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते व सुप्रसिद्ध निवेदक असणारे विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ व नवरात्र उत्सव सांस्कृतिक मंडळाचे संचालक एन. डी. पाटील यांचे शुक्रवार दि. २६/०४/२०२४ रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात आई, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर ६० फाटा, माळशिरस येथे निवासस्थाना शेजारील शेतामध्ये दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम शनिवार दि. २७/०४/२०२४ रोजी सकाळी ७ वाजता होणार आहे.
एन. डी. पाटील यांनी माळशिरस तालुक्यात कार्यातून स्वतःची ओळख निर्माण केलेली होती. विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक होते. काही वर्ष सचिव म्हणून काम केलेले आहे. नवरात्र उत्सवामध्ये व्याख्यानमाला कायमस्वरूपी सुरू होती. या सर्व गोष्टींमध्ये एन. डी. पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. उत्कृष्ट वक्ते व निवेदक म्हणून सुपरिचित होते. अनेकांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व विशेष करून लग्न कार्यामध्ये उपस्थितांचे स्वागत मोठ्या आवाजात करीत होते. असे सर्वांचे परिचित असणारे माळशिरस तालुक्यातील जेष्ठ नेतृत्व हरपलेले असल्याने माळशिरस तालुका पोरका झालेला आहे. यामुळे विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक कन्या प्रशाला, प्राथमिक व माध्यमिक विभाग, विवेकानंद ज्युनिअर कॉलेज माळशिरस, ब्लू बर्ड इंग्लिश स्कूल, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी यांच्यावतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहून त्यांच्या परिवारांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व मृतात्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.