कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा इ. 10 वी चा 96.78% निकाल

कु. आरती भैस कर्मवीर विद्यालयात व पिलीव केंद्रात 97.20% गुण मिळवून प्रथम
पिलीव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यालय व रमेश खलीपे जुनियर कॉलेजचा इयत्ता दहावीचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक इयत्ता दहावीची परीक्षा मार्च 2024 साली घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९६.७८ टक्के लागला असून परीक्षेत बसलेल्या एकूण 218 पैकी 211 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विद्यालयात व पिलीव केंद्रात प्रथम येण्याचा मान कु. आरती अजित भैस हिने 97.20 टक्के गूण मिळवून पटकाविला असून द्वितीय क्र. कुमारी सीमा सुहास करांडे हिने 96.20 टक्के तर कु. स्वप्नाली राजाराम सुळ हिला 95.60% गुण मिळाल्याने ती तिसऱ्या क्रमांकावर आली.
इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे ज्युनिअर कॉलेजच्या निकालाची परंपरा राखल्यामुळे शाळेचा निकाल 96.७८ टक्के लागून पहिल्या तीन मध्ये आलेल्या तिन्हीच्या तिन्ही मुली असून निकालामध्ये व गुणवत्तेमध्येही मुलींनीच बाजी मारली असल्याचे या निकालावरून दिसून येत आहे. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी कापसे वर्गशिक्षक अतुल पाटील तसेच सर्व विषयाचे शिक्षक व शिक्षिका व पालक गावातील नागरिक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आमच्या शाळेचा निकाल खुप चांगला लागला असून सर्व विद्यार्थी यांनी खुप चांगला अभ्यास केला केला व कष्ट घेतले सर्व विद्यार्थी व पालक यांचेही ह्या मुलांच्या यशा मध्ये खूप मोठे योगदान आहे. – वर्गशिक्षक, अतुल पाटील
मला माझे कुटुंबातील आजी आजोबा आई वडील चुलते काकी भाऊ बहीण यांचे चांगले संस्कार मिळाले व हे यश मिळवण्यासाठी मला शाळेतील सर्व विषयाचे शिक्षक व शिक्षिका यांचे खुप मोठे योगदान मिळाले आहे.माझा शिक्षणाचा पाया इयत्ता पहिली ते चौथी जि .प.प्रा.शाळा करांडे वस्ती पिलीव ह्या शाळेत तयार झाला असून पहिली ते दहावी पर्यंत मला चांगले शिक्षण देण्याऱ्या सर्व शिक्षक व शिक्षिका यांचे या यशामध्ये खुप मोठे मोलाचे योगदान आहे. – आरती अजित भैस, प्रथम क्रमांक