ब्रेकिंग न्यूज : आज आठादिवसा मंगळवारी ४ जूनला अकलूज परिसर अघोषित बंद राहणार

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पुनरावृत्ती माढा लोकसभेच्या निवडणुकीत होईल, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी मनातील सुप्त इच्छा व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची 2009 साली निवडणूक लढवलेली होती. त्यावेळेस स्वर्गीय भारतनाना भालके यांनी विजयदादांचा 38 हजाराच्या फरकाने पराभव केलेला होता. त्याचीच पुनरावृत्ती माढा लोकसभा मतदारसंघात कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवून केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय 50 हजाराच्या फरकाने निश्चित मानला जात आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पुनरावृत्ती माढा लोकसभेच्या निवडणुकीत होईल, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज आठादिवसा मंगळवारी ४ जून २०२४ रोजी अकलूज परिसर अघोषित बंद राहणार असल्याची माढा लोकसभा मतदारसंघासह अकलूज परिसरामध्ये कुजबुज सुरू आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घराणे आहेत, त्यापैकी मोहिते पाटील एक घराणे आहे. माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन केंद्रस्थानी राहिलेले होते. त्यांच्या पश्चात महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सहकार महर्षी यांच्या राजकीय विचाराचा वारसा पुढे जोपासलेला होता. मोहिते पाटील बोले आणि जिल्हा हाले असे परिस्थिती होती. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ, जिल्हा फेडरेशन, जिल्हा परिषद अशा अनेक संस्थांवर मोहिते पाटील यांची एकाधिकारशाही सुरू होती. मात्र, दिवसेंदिवस राजकीय परिस्थिती बदलत गेली. बदलत्या राजकारणात सोलापूर जिल्ह्यातील अजितदादा यंग ब्रिगेड यांनी मोहिते पाटील यांच्या राजकारणाला पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या वेळी चुणूक दाखवून सुरुंग लावलेला होता. दिवसेंदिवस सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलत गेली. मोहिते पाटील यांचे जिल्ह्यावरील अस्तित्व संपुष्टात येऊन माळशिरस तालुक्यापुरते मर्यादित राहिलेले होते. मोहिते पाटील परिवारातील सदस्य यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. भारतीय जनता पक्षामध्ये मोहिते पाटील नावाची राजकीय वर्तुळात भाजप पक्षामुळे चर्चा होती. मोहिते पाटील व कार्यकर्ते यांना आपलीच हवा आहे, असे दिवास्वप्न पडू लागले. भारतीय जनता पक्षाने राजकीय व आर्थिक केलेली मदत याचा विसर पडला. जयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपलाच आव्हान दिलेले आहे. बारामती, माढा, सोलापूर अशा ठिकाणचे लोकसभेचे उमेदवार पाडणार असल्याचे समाज माध्यमासमोर सांगितलेले होते.
माढा लोकसभेसाठी भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते. मात्र, भारतीय जनता पक्षाने कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुनश्च उमेदवारी दिलेली असल्याने मोहिते पाटील परिवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षात प्रवेश करून माढा लोकसभेची निवडणूक धैर्यशील मोहिते पाटील लढलेले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या भारतीय जनता पक्षाला आव्हान दिलेले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते पाटील विरोधक पुन्हा एकवटलेले आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पराभवानंतर मोहिते पाटील परिवार सावरत चाललेला होता. मात्र, माढा लोकसभेच्या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यानंतर सावरणे अवघड होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विधानसभेच्या निवडणुकीवेळी सुद्धा समर्थक व कार्यकर्त्यांचा असाच उत्साह व जल्लोष होता. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पुनरावृत्ती माढा लोकसभेच्या निवडणुकीत होईल, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. माळशिरस विधानसभा वगळता इतर कोणत्याही विधानसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य कमी पडणार नाही, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची खिंड लढवून बोगस व दडपशाहीने होणारे मतदान रोखलेले आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 70 ते 75 हजाराचे लीड मिळेल, असेही राजकीय विश्लेषकांमध्ये बोलले जात आहे. सातारा जिल्ह्यातील मान-खटाव व फलटण विधानसभा मतदारसंघात माळशिरस तालुक्याचे मताधिक्य घटविण्याची ताकद सातारा जिल्ह्याने पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर भूमिपुत्राला दिलेली आहे. सांगोला, करमाळा, माढा व पंढरपूर तालुक्यातील गावे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना विजयासाठी लागणारे मतदान मिळणार असल्याने पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यामुळे अकलूज परिसरात कोणीही बंदची हाक न देता स्वयंस्फूर्तीने अघोषित बंद होईल, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.