सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी आरोपीला कोर्टाने सुनावली शिक्षा

माढा (बारामती झटका)
माढा तालुक्यातील मौजे रांझणी येथील महामार्ग हायवे क्रमांक 65 येथे दि. 18/3/2016 रोजी दुपारी 3-00 वा चे सुमारास जमीन गट नंबर 32 व 36 या जमिनीतील कब्जा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे संचालक यांना देण्यासाठी तलाठी श्री. नागेश महादेव सोनवणे, तहसीलदार श्री. कटकधोंड, श्री. भारत कोंडीबा खुळे गावकामगार तलाठी, इतर ग्रामस्थ हे हजर राहून शासकीय काम करत असताना दुपारी 4.00 वा. सुमारास रांझणी गावातील समाधान नामदेव चव्हाण (वय 30 वर्ष) हा त्या ठिकाणी आला व माझ्या शेतातील पाईपलाईनचा प्रश्न आधी सोडवा नंतर जागेचा कब्जा घ्या. मी तोपर्यंत काम करून देणार नाही, तुम्ही काम कसे करता ते बघतोच, असे म्हणून मोठ्या मोठ्याने आरडा-ओरडा करून, एक एकाला खलास करतो असे म्हणून शासकीय काम बंद पाडले. प्रभारी मंडलाधिकारी श्री. नागेश सोनवणे यांनी सरकारी काम करीत असताना अडथळा आणला, दमदाटी व शिवीगाळी करून काम थांबवले म्हणून टेंभुर्णी पोलीस ठाण्यास येऊन आरोपी समाधान नामदेव चव्हाण रा. रांझणी, ता. माढा याचे विरुद्ध टेंभूर्णी पोलीस ठाणेस गु.र.नं 123/2016 भा.द.वि. कलम 353,504,506 अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पो.हे.काॅ./305 गोडसे यांनी करुन आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हा शाबितीसाठी 6 साक्षीदार तपासण्यात आले. यातील फिर्यादी व साक्षीदार यांची साक्ष तसेच तपासी अंमलदार पो.हे.काॅ. अनिल गोडसे यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे हे सरकारी वकिल श्रीमती राजश्री कदम यांनी मा न्यायालयासमोर मांडले.
सरकारी पक्षाचा पुरावा याचा विचार करता मा. जिल्हा न्यायाधीश श्री. एल. एस. चव्हाण साहेब यांनी आरोपी समाधान नामदेव चव्हाण रा. रांझणी, ता. माढा यांस भा.द.वि.क. 353 अन्वये दोषी ठरवून कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व 15,000/- रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. यावेळी सरकारी पक्षातर्फे श्रीमती राजश्री कदम यांनी काम पाहीले.
सदर केसमध्ये मा. श्री. अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा व मा. श्री. दिपक पाटील पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस ठाणे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी काम पाहिले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.