संभाजी बाबा दरा, भांब येथील पन्नास वर्षाचा रस्त्याचा प्रलंबित प्रश्नाचा गौतमआबा माने पाटील यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला…
भांब (बारामती झटका)
माळशिरस पंचायत समितीचे सदस्य पश्चिम भागातील ज्येष्ठ नेते गौतमआबा माने पाटील यांच्या मध्यस्थीने भांब, ता. माळशिरस येथील रस्त्याच्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा निघाला आहे. भांब ते संभाजी बाबा दरा या रस्त्याचा मदने वस्ती शेजारच्या ओढ्याचा वाद होता. गेली 50-60 वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न गौतमआबा माने पाटील यांच्या मध्यस्थीने खेळीमेळीत भर पावसात तोडगा निघून कायमचा मिटलेला आहे.
ओढ्याच्या लगतचे शेतकरी श्री. शंकर पांढरे, श्री. सतीश पांढरे, श्री. रामा खरात, श्री. पांडुरंग खरात, श्री. श्रीराम ढवळे, श्री. मारुती ढवळे यांचा ओढ्यामध्ये जमिनीचा वाद होता. सदरच्या वादावर दि. 23/06/2024 रोजी सकाळी दहा वाजता तोडगा निघाला. विशेष म्हणजे भर पावसात सर्वांनी जागेवरच वाद मिटवला. यावेळी श्री. सोपान काळे माजी सरपंच भांब, श्री. शंकर पाटील, संभाजी शेंडगे, भानुदास शेंडगे, श्री. पंढरीनाथ काळे, श्री. रघुनाथ पांढरे, श्री. पोपट सरगर सरपंच, सुरेश काळे ग्रामपंचायत सदस्य, श्री. भगवान शेंडगे (रेडे), सतीश शेंडगे, श्री. दादा ढवळे, आप्पा ढवळे आदी गावातील मान्यवर उपस्थित होते.
श्री शिखर शिंगणापूरच्या डोंगर कपारीच्या पायथ्याला माळशिरस व म्हसवडच्या सरहद्दीवर संभाजी बाबा दरा हे जागृत देवस्थान आहे. भांब पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर संभाजी बाबा दरा मंदिर आहे. या ठिकाणी श्री शंभू महादेवाची स्वयंभू पिंड आहे. सदरच्या ठिकाणी श्रावण व इतर महिन्यांमध्येही कायम भाविकांची वर्दळ असते. सदरच्या शंभू महादेव मंदिराचा जिर्णोद्धार सुरू आहे. म्हाडाचे उपमुख्य अभियंता श्री. भीमराव काळे व संभाजी बाबा दरा कुस्ती केंद्र यांच्या माध्यमातून मंदिर परिसर विकास सुरू आहे.
माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी संभाजी बाबा दरा या ठिकाणी हायमास्ट दिवा व पेव्हर ब्लॉक दिलेले आहेत. भांबपासून संभाजी बाबा दरा या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांची अडचण होती व भांब ग्रामस्थांची रस्त्याची मागणी होती. सदरच्या रस्त्याला कोट्यावधी रुपयाचा लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी निधी मंजूर केलेला होता. रस्त्याचे काम सुरू होते मात्र, गेली अनेक वर्ष रस्त्यावर ओढा होता. सदरच्या ओढ्याचा वाद होता. त्यामुळे रस्ता बनविण्यासाठी अडचण होती. ती अडचण पंचायत समितीचे सदस्य पश्चिम भागातील ज्येष्ठ नेते गौतमआबा माने पाटील यांनी मध्यस्थी करून सदरच्या रस्त्याचा प्रश्न सोडविलेला असल्याने संभाजी बाबा व शंभू महादेवाच्या भक्तांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.