तांदुळवाडी गावचा सुपुत्र शुभम जगताप घेणार अमेरिकेत शिक्षण…
तांदुळवाडी (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील शुभम नंदकुमार जगताप हा विद्यार्थी मास्टर इन फायनान्स हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अमेरिकेत जाणार असून परड्यु युनिव्हर्सिटी मध्ये तो हे शिक्षण पूर्ण करणार आहे. तांदुळवाडी गावातील अमेरिकेत शिक्षण घेणारा हा दुसरा विद्यार्थी ठरत असून यापूर्वी ज्ञानेश्वर चंद्रकांत कदम यांनी देखील अमेरिकेत शिक्षण घेतले होते. परदेशात शिक्षणासाठी जात असलेल्या शुभमला तांदुळवाडी, भाळवणी परिसरातील हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या. सर्वत्र त्याचे कौतुक होताना दिसत आहे.
वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारे गाव म्हणून तांदूळवाडी गावची नेहमीच ओळख सांगितली जाते. शेती आणि दुग्ध व्यवसाय हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. माळकऱ्यांचे गाव म्हणून तांदुळवाडीची नेहमीच वेगळी ओळख राहिली आहे. आपला शेती व्यवसाय करत असताना शिक्षणाला देखील या गावाने तितकेच महत्त्व दिलेले आहे. त्यामुळे आजही अनेक क्षेत्रात या गावातील विद्यार्थी मोठमोठी जबाबदारी सांभाळताना दिसतात. काही दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर चंद्रकांत कदम यांनी अमेरिकेत शिक्षण घेतले. त्यानंतर शुभम नंदकुमार जगताप हा आता मास्टर इन फायनान्स हे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेतील जगात नामांकित समजल्या जाणाऱ्या परड्यू युनिव्हर्सिटी मध्ये जाणार आहे. त्याला त्याचे आजोबा नागू बापू जगताप गुरुजी, वडील डॉ. नंदकुमार जगताप, आई डॉ. स्वाती जगताप यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले असून उच्च ध्येय ठेवून शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी त्याने एक प्रेरणा निर्माण केली आहे.
ग्रामीण भागात राहून सुद्धा शुभमचे ध्येय खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण सिंहगड पब्लिक स्कूल पंढरपूर, संजय गोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर या ठिकाणी झाले. तर अकरावी व बारावीचे शिक्षण त्याने बंसल पब्लिक स्कूल कोटा, राजस्थान या ठिकाणी पूर्ण केले. बारावीनंतर त्याने चार वर्षाचा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग हा कोर्स देखील व्ही. आय. टी. वेल्लोर, तामिळनाडू येथे पूर्ण केला. व टाटा मोटर्स, पुणे या ठिकाणी इंटरशिप देखील त्याने केलेली आहे. त्यानंतर आता अमेरिकेत मास्टर इन फायनान्स याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी जगातील ८९ नंबरचे रैंकिंग असणारे परड्यू युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला आहे.
त्यानंतर यूपीएससी हे त्याचे लक्ष असून ध्येय गाठण्यासाठी तो परिश्रम घेताना दिसतो आहे. शुभमने खरोखरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श उभा केला असून त्याची प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील भविष्यात पुढे येतील, असाही आशावाद व्यक्त केला जात आहे. तांदुळवाडी ग्रामस्थांच्या वतीने शुभम व वडील डॉ. नंदकुमार जगताप यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Fantastic beat I would like to apprentice while you amend your web site how could i subscribe for a blog site The account helped me a acceptable deal I had been a little bit acquainted of this your broadcast offered bright clear concept
A kind of nationalities in between the nature If we would care about