बेंबळे येथे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह शिंदे यांच्या शुभहस्ते रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन

बेंबळे (बारामती झटका)
बेंबळे येथे आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मंजूर झालेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार १ कोटी ६६ लाख रुपये किंमतीच्या रस्त्याच्या कामाचे सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.


विशेष वृत्त असे की, टेंभुर्णी-बेंबळे रस्त्यावरील उजनी कालवा क्र. ३५ किलोमीटर ते पवार वस्ती नजिक असलेल्या जुन्या काँक्रिटीकरण पर्यंत १ किमी व शिवाजी चौक बेंबळे ते परिते रोड दीड किलोमीटर कामाचे डांबरीकरण करण्यात येणार असून परिते रस्त्यावर असलेल्या व अनेक दिवसांपासून गैरसोयीचा होत असलेल्या ओढ्यावरील पुलाची उंची वाढवणे व त्यावर काँक्रिटीकरण करणे अशा स्वरूपाचे काम असून याचे भूमिपूजन रणजीतसिंह शिंदे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
हे काम आगामी तीन महिन्याच्या आत पूर्ण होणार आहे. याप्रसंगी रणजितसिंह शिंदे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास माजी सरपंच कैलास भोसले, सोसायटी चेअरमन संजय पवार, एकनाथ भोसले, आबा काळे, जयवंत भोसले, माणिक कोकाटे, लक्ष्मण गळगुंडे, विश्वजीत भोसले, सहाय्यक अभियंता अजित मुळे तसेच ठेकेदार विजय बागल, शहाजी भोसले, अनिल आवताडे, दादासाहेब भोसले, बाळू कोकाटे, डॉ. भीमराव पवार, माऊली पवार, अभयसिंह भोसले, धनंजय काळे, पांडू हुलगे यांच्यासह इतर अनेक गावकरी उपस्थित होते.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.