मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांकडून १०० रु. आणि २०० रु. शुल्क आकारल्याच्या प्रकरणी संबंधित नेट कॅफे चालकांविरुद्ध गुन्हा दाखल

तिरोडा (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्यशासन ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यात सर्वत्र राबवली जात आहे. या योजनेसाठी अर्ज भरताना सावंतवाडी येथील सात रस्ता परिसरातील दोन ‘नेट कॅफे’ चालकांनी लाभार्थी महिलांकडून १०० रुपये आणि २०० रुपये शुल्क आकारल्याच्या प्रकरणी संबंधित नेट कॅफे चालकांविरुद्ध ६ जुलै या दिवशी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील कोणत्याही ‘महा-ई-सेवाकेंद्रा’ वर किंवा नेट कॅफेवर या योजनेचे अर्ज भरण्यासाठी संबंधित महिला लाभार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.


या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहिना १ हजार ५०० रुपये शासन देणार असून यासाठी प्रतिवर्षी ४६ हजार कोटी रुपयांचे प्रावधान राज्यशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरत असताना ‘महा ई-सेवा केंद्र’ अथवा ‘नेट कॅफे यांनी कोणतेही शुल्क न आकारता विनामूल्य अर्ज भरून महिला लाभार्थ्यांना सहकार्य करण्याविषयी शासन निर्णय निर्देशित केलेला आहे. शासन संबंधित सेवाकेंद्राला प्रतिअर्ज ५० रु. शुल्क देणार आहे.
श्री. दिनेश शांताराम मयेकर.
सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक तिरोडा (सावंतवाडी, सिंधुदुर्ग)
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



