फलटण तालुक्यातील जनतेला व कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर

राज्याच्या अर्थसंकल्पात १० कोटींची विकासकामे मंजूर
फलटण (बारामती झटका)
नुकत्याच झालेल्या राज्य अर्थसंकल्पामध्ये फलटण तालुक्यातील ४५ गावांमध्ये १० कोटी रुपयांचे रस्ते, पुल, संरक्षक भिंत, मोरीचे बांधकाम इत्यादी कामांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नातून व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून निधी मंजूर झाला आहे. तालुक्यातील जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार असून विधानसभा मतदारसंघातील जनतेला व कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पुढील काळात राज्य सरकार व केंद्र शासनाच्या वतीने जेवढा निधी आणता येईल तेवढा आणला जाईल, अशी माहिती कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक यांनी दिली.


यावेळी पुढे बोलताना कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, तालुक्यातील जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. या तालुक्यातून १७ हजार मताचे मताधिक्य लोकसभेला मला दिले आहे. त्या ऋणातून मी उतराई होऊ शकत नाही. या तालुक्याच्या विकासासाठी जी कामे यापूर्वी मंजूर केलेली आहेत ती पूर्ण करणे व भविष्यात येणाऱ्या सर्व अडचणीसाठी या तालुक्यातल्या जनतेशी कायम त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. मी मंजूर केलेल्या पाणी योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मी प्रशासनाला दिले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.