आरोग्यताज्या बातम्या

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांची भांड मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिकला सदिच्छा भेट…

नातेपुते (बारामती झटका)

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी भांड मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिकला सदिच्छा भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अक्षयभैया भांड, डॉ. सौ. क्षितिजा भांड, प्रशांत ठोंबरे, प्रतिम काटकर, रियाज शेख, अक्षय चौगुले, बबन आकाडे, पृथ्वीराज भांड, स्वप्निल भांड, आकाश भांड, कन्हैया भांड, साईराज भांड आदी उपस्थित होते.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पायीवारी पालखी सोहळ्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने आरोग्य वारी कार्यक्रमानिमित्त नातेपुते येथे आलेल्या होत्या. त्यावेळेस आवर्जून भांड मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिकला सदिच्छा भेट दिली.

डेंटल क्लिनिक पाहिल्यानंतर रूपालीताई चाकणकर यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागामध्ये आपल्या शिक्षणाचा फायदा होऊन खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील गरजू लोकांना अद्यावत नवनवीन टेक्नॉलॉजीचे उपचार मिळणार असल्याने डॉ. सौ. क्षितिजा भांड यांचे कौतुक केले.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांचा सौ. क्षितिजा भांड व अक्षय भैया भांड यांच्या वतीने पांडुरंग व रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन सन्मान करण्यात आला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

6 Comments

  1. I was recommended this blog by my cousin I’m not sure whether this post is written by him as nobody else know such detailed about my problem You are wonderful! Thanks!

  2. ในฐานะแพลตฟอร์มการพนันที่มีประสบการณ์ยาวนานหลายปี fun88 มุ่งมั่นที่จะมอบประสบการณ์การพนันออนไลน์ที่ปลอดภัย ยุติธรรม และน่าตื่นเต้นแก่ผู้เล่น.fun88 มือถือ

  3. The major risk factors for GMH include a young gestational age, low birth weight, acute amnionitis, and not receiving antenatal steroids for at least 48 hours [url=https://fastpriligy.top/]paxil or priligy[/url] Rusty pbayoEkMsbfYZZOA 6 17 2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button