सामाजिक न्यायाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प आहे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई (बारामती झटका)
सामाजिक न्यायाला झुकते माप देणारा यंदाचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे. दलित आदिवासी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी, वृद्ध जेष्ठ नागरिक, दिव्यांग, निराधार महिला आणि ट्रान्सजेंडर अशा सर्व दुर्बल घटकांना सामाजिक न्यायाच्या भावनेतून मदत करण्यासाठी केंद्र सरकारने सामाजिक न्याय मंत्रालयाचे बजेट 37 टक्क्यांनी वाढवून 13 हजार 539 करोड रुपयांचा भरघोस निधी या बजेटमध्ये दिलेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष २०२४ चा सादर केलेला अर्थसंकल्प हा सामाजिक न्यायाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प आहे, असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
मुद्रा कर्जाची रक्कम 20 लाख पर्यंत वाढविण्यात आली आहे. पीएम शहरी आवास योजनेत 1 कोटी गरिबांना घरे देण्यासाठी 10 लाख कोटीचे उद्दिष्ट ठेऊन अधिक लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 80 कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य अशा अनेक योजनाद्वारे गरिबांचे कल्याण करणारा अर्थसंकल्प आहे.
भारत देश विकसित करण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी देशातील दलित आदिवासी सर्व दुर्बल समाज घटकांचा विकास होणे आवश्यक आहे. सर्व दुर्बल घटकांसह शेतकरी, कष्टकरी, कामगार सर्वांचा विकास करून तरुणांना कौशल्य आणि उद्योगांना चालना देऊन देशाचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार काम करीत आहे. त्यासाठी वर्ष 2024-25 साठी सादर केलेला अर्थसंकल्प हा समाजातील सर्व समाज घटकांना न्याय देणारा आणि भारत देशाला आर्थिक महासत्ता होण्याची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प आहे, असे ना. रामदास आठवले म्हणाले.
सामाजिक न्यायाचे बजेट भरघोस वाढवण्यात आलेला आहे. तब्बल 37 टक्क्यांनी सामाजिक न्याय मंत्रालयाचा बजेट वाढवण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने गरिबांच्या कल्याणासाठी मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकार कार्यरत आहे. गरिबांच्या कल्याणासाठी, दलित आदिवासींच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकार काम करीत आहे. त्यामुळेच एनडीए सरकारच्या या तिसऱ्या कालखंडाच्या पहिल्याच बजेटमध्ये सामाजिक न्यायाला प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यामुळे देशभरातील दरीत आदिवासी बहुजनांच्या वतीने या बजेटचे आम्ही स्वागत करतो. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सुद्धा आम्ही केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पाचे स्वागत करतो. सामाजिक न्यायाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प आहे, असे सांगत ना. रामदास आठवलेंनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Great job on explaining this topic clearly and concisely!
https://crackshere.com/
I loved as much as you will receive carried out right here The sketch is attractive your authored material stylish nonetheless you command get got an impatience over that you wish be delivering the following unwell unquestionably come more formerly again since exactly the same nearly a lot often inside case you shield this hike