वेतनत्रुटी समितीकडे ग्रामसेवक संघटनेची कृषी सहाय्यक प्रमाणे वेतन देण्याची मागणी

मुंबई (बारामती झटका)
दि. ०२-०८-२०२४ रोजी न्यायालयिन निकालावर आधारीत वेतनत्रुटी समिती समोर महाराष्ट्र राज्य कृषि पदविधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व ग्रामसेवकांना दोन पैकी (ग्रामसेवक – ग्राविअ) पद एकत्रित करुन (पदनाम गाविअ किंवा शासनास जे सोईचे वाटेल ते) करुन कृषी सहाय्यकाप्रमाणे वेतन मंजुर करुन ५ व्या वेतन आयोगापासुन वेतनत्रुटी निर्माण झालेली आहे, ती दुर करावी अशी मागणी केली.
मा. उच्य न्यायालयाने देखील राज्याध्यक्ष श्री. नितिन धामणे (छ.संभाजीनगर) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर कृषी सहाय्यकाप्रमाणे वेतनत्रुटी दुर करणे बाबत गुणवत्तेवर निर्णय घ्यावा, असे आदेश २०१९ मध्येच दिलेले होते. त्यावर अंमलबजावणी होत नसल्यामुळे संघटनेच्या वतीने अवमान याचिका दाखल करण्याचे शासनाकडे कळविताच शासनाकडुन सदर समितीची नेमणुक करण्यात आलेली होती. समितीकडे ग्रामसेवक संवर्गाच्या वेतनत्रुटीबाबत राज्याध्यक्षांसह सचिव श्रीहरीश्चंद्र काळे (अहमदनगर), कार्याध्यक्ष मधुकर मुंगल (नांदेड), राज्यकोषाध्यक्ष महेंद्र निकम (छ. संभाजीनगर), सुरेश चौधरी (जिल्हाध्यक्ष, छ. संभाजीनगर), शशी नरोडे (जिल्हा सचिव, अहमदनगर) आदी उपस्थीत होते.

राज्यातील ग्रामसेवकांना समितीच्या शिफारशीमुळे नक्कीच पुढील काही महीन्यात वेतनत्रुटी दुर होऊन दोन पदा ऐवजी एकच पद निर्माण झाल्याची आनंदवार्ता सर्व ग्रामसेवकांना मिळेल असे राज्याध्यक्षांनी सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.