ताज्या बातम्या

विठ्ठलराव शिंदे कारखान्यास नॅशनल फेडरेशन, नवी दिल्ली यांचेकडून देशपातळीवरील उच्चांकी गाळपाचा पुरस्कार प्रदान

बेंबळे (बारामती झटका)

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को. ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि. नवी दिल्ली यांचेकडून युनिट नं. १ पिंपळनेर येथील कारखान्यास सन २०२२-२३ गळीत हंगामातील विक्रमी ऊस गाळप/उच्च साखर उतारा विभागात सहकार क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार शनिवार दि. १० ऑगस्ट, २०२४ रोजी नवी दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

नॅशनल फेडरेशन ऑफ को. ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि. नवी दिल्ली या संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्याचे मुल्याकंन करण्यात येते. त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकत्तम साखर उतारा, सर्वात जास्त साखर निर्यात अशा विविध क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मुल्यामापन केले जाते. ऊस गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं. १ पिंपळनेर येथे १८ लाख ४१ हजार ४२० मे. टन इतके विक्रमी ऊस गाळप झालेले आहे.

याआधारे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. युनिट नं. १ पिंपळनेर या कारखान्याची सन २०२२-२३ गळीत हंगामातील विक्रमी ऊस गाळप या पुरस्कारासाठी निवड झालेली होती. सदर जाहीर पुरस्काराचे वितरण शनिवार दि. १० ऑगस्ट, २०२४ रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय उर्जा व अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांचे शुभहस्ते व नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे व आदी मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार वितरण समारंभासाठी पंचायत समिती सभापती तथा कारखान्याचे संचालक विक्रमसिंह शिंदे, पोपट गायकवाड, शिवाजी डोके, रमेश येवले पाटील, वेताळ जाधव, लक्ष्मण खुपसे, विष्णु हुंबे, सुरेश बागल, पोपट चव्हाण, संदीप पाटील, सचिन देशमुख, पांडूरंग घाडगे, लाला मोरे, हनुमंत घाडगे, भरत चंदनकर, अशोक मिस्कीन, आप्पासो उबाळे, कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, जनरल मॅनेजर सुहास यादव व इतर मान्यवर उपस्थित होते.

कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ. बबनराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट नं.१ पिंपळनेर व युनिट नं. २ करकंब या कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असून विठ्ठलराव शिंदे कारखान्यास यापूर्वी उत्तम तांत्रिक कार्यक्षमता, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट उद्योजगता, उत्कृष्ट ऊस विकास, उच्चांकी साखर निर्यात, उच्चांकी गळीत यासाठी देश व राज्यपातळीवरील एकूण २४ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. – वामनराव उबाळे, व्हाईस चेअरमन

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button