ताज्या बातम्यासामाजिक

उघडेवाडी गावच्या नूतन उपसरपंच पदी सौ. अंजली सागर सस्ते यांची बिनविरोध निवड..

वेळापूर (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी गावचे नूतन उपसरपंच सौ. अंजली सागर सस्ते यांची बिनविरोध निवड आज मंगळवार दि. १३/०८/२०२४ रोजी. दुपारी ०१ वा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा माळशिरस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सरवदे साहेब, सरपंच सौ. जिजाबाई गवळी, श्री. अजितसिंह माने देशमुख, श्री. रवींद्र घोरपडे, श्री. तानाजी जगदाळे, मोहन कचरे यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. गिरीजा उघडे, सौ.. सोनाली काटकर, सौ. लक्ष्मी उबाळे, सौ. प्रतिमा कोळेकर, सौ. सिमाली साठे, माजी उपसरपंच श्री. माधव कदम, श्री. संग्रामसिंह माने देशमुख, महेंद्र घोगरे, नितीन चौगुले, सौ. संगीता पवार, पोलीस पाटील दिपाली गोडसे, सौ. हेमा चौगुले, ग्रामपंचायत कर्मचारी सदा साठे, अतुल उबाळे यांच्या उपस्थितीमध्ये निवड करण्यात आली.

यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्यावतीने तसेच ग्रामस्थ यांच्यावतीने नूतन उपसरपंच सौ. अंजली सस्ते यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री. विठ्ठल कोळेकर, देविदास जाधव, गणेश गोरे, सोमनाथ भोसले, नयन कुमार चौगुले, पोपट जाधव, माजी सरपंच चांद मुलाणी, इनुस कोरबू, महादेव सस्ते, नागनाथ सस्ते, सागर सस्ते यांच्या उपस्थितीमध्ये अभिनंदन व सत्कार करण्यात आला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button