झेडपीतील धडधाकट दिव्यांगाना शंभर किलोमीटरवर बदली करा, अनिल देशपांडे यांची मागणी…
झेडपी प्रशासन दिव्यांगाची घेईना दखल
सोलापूर (बारामती झटका)
बदली व बढतीसाठी संवर्ग १ मधुन अर्ज भरलेल्या धडधाकट दिव्यागांची प्रत्यक्ष तपासणी करुन त्यांना पदावन्नत करुन सध्या असलेल्या कार्यक्षेत्रातुन किमान १०० किमी वर बदली करावी, अशी मागणी बार्शी तालुक्यातील चिंचोली येथील अनिल देशपांडे या उपशिक्षकांनी सीईओ यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
सध्या बदली स्थगिती, बदली, बढतीसाठी अनेक कर्मचाऱ्यांनी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. सदरचे प्रमाणपत्र सादर करुन बदलीतून स्थगिती, इच्छित स्थळी बदली व बढती मिळविली आहे. केवळ बदली आणि बढतीसाठी सेवेमध्ये दाखल झाल्यावर अनेकांनी ही प्रमाणपत्रे काढली आहेत. त्यामुळे मूळ २ ते ३% खरे खुरे दिव्यांग आहेत ते बाजूला फेकले गेले आहेत ही, अत्यंत संतापजनक व दुर्दैवी बाब आहे.
आज एकुण कर्मचाऱ्यांच्या १८ ते २१% कर्मचारी दिव्यांग प्रमाणपत्रांचा आधार घेऊन बदली स्थगिती, बदली व बढतीसाठी लाभ घेत आहेत. आणि यांना ना प्रशासनाची व ना प्रशासनातील कोणाची भितीही वाटत नाही. आमचं कोणी काही करु शकत नाही, ही त्यांची आत्मभावना अत्यंत प्रबळ आहे. प्रशासनाने राज्यातील परिक्षा परिषदेतील टीईटी तील घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा व बोगसपणा समोर येईल. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या प्रमाणपत्राला आव्हान देत नाही. कारण प्रमाणपत्रे तपासणीसाठी पाठविले तर ते त्यांच्याकडून देण्यात आल्याचेच ते सांगतील किंवा लेखी देतील. ज्या कर्मचाऱ्याला हे प्रमाणत्र इश्यू झाले आहे. त्यावर माझी व अनेकांची हरकत आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डमी उमेदवार तपासणीसाठी देऊन दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढल्याचे समोर येत आहे.
प्रशासनाने या बाबी तपासाव्यात ….
एकुण झालेली सेवा, दिव्यंगता कधी आली, सेवेत लागताना प्रथम वैद्यकीय तपासणी केल्याची दिनांक व त्याचा फिट / अनफिटचा अभिप्राय, जिल्हा शल्य चिकीत्सककडे किती वेळा गेलात त्याची रजा व दिनाक, सीएसकडे जाण्यापूर्वी काही खाजगी रुग्णालयात औषधोपचार तपासण्या केल्या असतील तर सर्व केसपेपर्स, गोळ्या, औषधे घेतल्याचा तपशिल व त्याच्या साक्षांकित प्रती, खाजगी रुग्णालयाने दिलेले सर्व अभिप्राय, दृष्टीदोष असल्यास त्यांची केलेली टेस्ट, जोडीदार पती, पत्नीची तपासणी करावी.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
lamerler olmez