एकशिव गावचे ग्रामसेवक श्री. एच. एस. पवार यांचे दोन वेतन वाढ तात्पुरत्या स्वरूपात बंद करून मूळ सेवा पुस्तकात नोंद केली…

राष्ट्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रशांत रुपनवर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश…
माळशिरस (बारामती झटका)
राष्ट्रसेवा प्रतिष्ठान संस्थापक ॲड. प्रशांत सुरेश रुपनवर पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायतीमधील विविध विकासकामे पंधरावा वित्त आयोगामध्ये अनियमितता झालेली असल्याची तक्रार दिलेली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांना सदरच्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे गटविकास अधिकारी माळशिरस यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम 1967 मधील नियम 03 चा भंग केलेला असल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 मधील नियम क्रमांक 04 नुसार तुमचे विरुद्ध शिस्तभंग विषयी कारवाही करण्यात येत असून तुमची दोन वेतन वाढ तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येत आहे. त्याची नोंद तुमचे मूळ सेवा पुस्तकात घेण्याबाबतची कारवाही करण्यात येत आहे, असा आदेश दिलेला असल्याने माळशिरस तालुक्यात खळबळ माजलेली आहे.

ॲड. प्रशांत रुपनवर पाटील यांनी अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने तक्रार केलेली होती. त्यामध्ये स्तंभ क्रमांक 1 व 2 अन्वये 15 वित्त आयोगांमधून सन 2020-21 मध्ये महिला बचत गट शेडचे काम केलेले प्रत्यक्षात मरीआई मंदिराचे असून सदरचे काम बोगस दाखवणे नमुना नंबर 12 मध्ये सरपंच स्वाक्षरी न घेणे, जी. एम. पोर्टलवर खरेदी केलेले साहित्याची बोगस बिले तयार करणे, ग्रामपंचायतीचे सचिव या नात्याने ग्रामपंचायत अक्षम्य दुर्लक्ष करणे इत्यादी गैरशिस्तीचे वर्तनाबाबत श्री. एच. एस. पवार ग्रामसेवक ग्रामपंचायत एकशिव हे शिस्तभंगाचे कारवाईस पात्र आहेत. ही बाब कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने योग्य नाही. तसेच ही बाब गंभीर स्वरूपाची असून शिक्षेस पात्र आहेत असा आदेशामध्ये उल्लेख केलेला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.