ताज्या बातम्याराजकारण

तीस वर्षात प्रत्येक वेळी मला विक्रमी मताधिक्याने विजयी केलेत म्हणून मतदारसंघात विकास करण्याची जिद्द, ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली; रणजीत शिंदे विकासाची वाटचाल निश्चित चालू ठेवणार – आ. बबनदादा शिंदे

जनसंवाद यात्रेची तयारी बैठक…

माढा (बारामती झटका)

माढा विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी मागील तीस वर्षात प्रत्येक निवडणुकीत मला विक्रमी मताधिक्याने विजयी केले आणि त्यामुळेच प्रत्येक वेळेस मला विकासकामे करण्यासाठी जिद्द, चिकाटी, प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली आणि म्हणूनच मला तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने या मतदारसंघांमध्ये विकासाची गंगा आणून तमाम बंधू भगिनींचे व हजारो कुटुंबीयांचे सामाजिक, औद्योगिक, व आर्थिक व जीवनमान उंचावण्यासाठी परमेश्वराने शक्ती दिली व याच यशस्वी पाऊल खुणावर यापुढेही रणजीत शिंदे वाटचाल करील याची मी ग्वाही आणि पूर्ण विश्वास देतो, असे प्रतिपादन आ. बबनराव शिंदे यांनी केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ‘जनसंवाद यात्रेची’ तयारी व आगामी निवडणुका संदर्भात विठ्ठलराव शिंदे कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी आ. बबनराव शिंदे यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

कुठूनही उसाचे वजन करून आणा….
सक्षमपणे कारखाना चालवणारच….
आ. शिंदे म्हणाले की, विरोधकाकडे सांगण्यासारखे काही नाही. त्यामळे हे सतत काटा मारल्याचा व इतर आरोप करीत आहेत. दहा-दहा वेळा तेच-ते सांगितल्याने सर्वांना खरे वाटते. आपल्या कारखान्याकडे हजार पेक्षा जास्त ट्रॅक्टरवाले आहेत ते सर्व सुज्ञ आहेत. तसेच कोणीही बाहेरून उसाचे वजन करून आणावे असे खुले आवाहनही यावेळी आ. शिंदे यांनी केले. तसेच विरोधकांचा गैरसमज करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे असा आरोप आ. शिंदे यांनी केला. स्वतःची मालमत्ता असल्याप्रमाणे कारखाना सांभाळला आहे. भविष्यात ही तो सक्षमपण चालावला जाईल असे अभिवचन त्यांनी दिले.

आ. शिंदे म्हणाले की, तालुक्यातील उपसा सिंचनच्या उर्वरित कामासाठी तीनशे कोटी मंजूर झाले आहेत. भीमा नदी व सीना नदीमध्ये बॅरेजेस बांधण्याची मागणी केलेली आहे. यासाठी १५०० कोटी रु. खर्च अपेक्षित आहे. मोडनिंब एमआयडीसीचा प्रस्ताव मार्गी लागेल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, लवकरच यश येईल. तालुक्यात पस्तीस हजार एकर क्षेत्र बागायत झाले आहे. मानेगाव कडील काही भाग फक्त राहिला आहे. हे झाल्यास सर्व तालुका शंभर टक्के बागायत होईल. २४ वर्षांपूर्वी तालुक्यात फक्त दहा हजार मे.टन ऊस होता. आज त्याच तालुक्यात चाळीस लाख टन ऊस झाला आहे. त्याचबरोबर केळी, डाळिंब, द्राक्षे याचेही उत्पादनात तालूका आज आघाडीवर असून हेच विकासाचे द्योतक आहे. पहिल्याच हंगामात आपण पाच लाख गाळप करून पारितोषिक मिळवले होते. विकासाची सर्व कामे लक्ष देऊन करण्यात आलेली आहेत. विजेचे सर्व प्रश्न मार्गी लावलेले आहेत. उरलेले प्रश्नही आगामी काळात पूर्ण करू. शैक्षणिकदृष्ट्या तालुक्यात चार महाविद्यालये आहेत. जिथे संधी मिळाली तिथे कमी पडलो नाही. सर्वांनी सर्व कामाला साथ दिली. तशीच पुढेही द्यावी अशी विनंती त्यांनी केली.

शेवटी आमदार शिंदे यांनी सांगितले की, आता प्रकृती साथ देत नाही म्हणन आपण सर्वांनी प्रयत्न करून रणजित शिंदे यांना निवडून आणले पाहिजे अशी विनंती आमदार शिंदे यांनी केली.

आमदार शिंदे म्हणाले, नकारात्मक विचारसरणीचे अनेक लोक आपल्याबद्दल फुगे-वावड्या उडवत आहेत. पण जनतेचा आमच्यावर प्रचंड विश्वास आहे व आपली सर्व माणसे जाग्यावर आहेत. कसलीही अडचणी येणार नाही, असा विश्वासही आमदार शिंदे आणि व्यक्त केला.

यावेळी व्हा. चेअरमन वामनराव उबाळे, शिवाजी पाटील, शंभूराजे मोरे, अशोक शिंदे, विनायक चौगुले, अशोक खटके, अमोल देवकते, भोसले सर, मोहन मोरे, दिलीप यादव, रामभाऊ शिंदे, बंडूनाना ढवळे, विष्णू हुंबे, संतोष पाटील आदी मान्यवरांनी आपले समाजात विचार व्यक्त करून आगामी विधानसभा निवडणुकीत रणजीतभैया शिंदे यांना दादांच्या इतक्याच प्रचंड मतांनी विजयी करण्याचे निश्चयी आव्हान केले.

यावेळी व्हा. चेअरमन वामनराव उबाळे, शिवाजी पाटील, बंडूनाना ढवळे, रमेश पाटील, दिलीप भोसले, झुंजार भांगे, शंभुराजे मोरे, लक्ष्मण खूपसे, शिवाजी डोके, पांडुरंग घाडगे, रमेश येवले-पाटील, लाला मोरे, अशोक मिस्किन, रामभाऊ पाटील, राजमाने, हनुमंत चव्हाण, भरत चंदनकर, नागनाथ पाटील, शिवाजी पाटील, जगन्नाथ श्रीखंडे आदी मान्यवर, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

“अभिजीत पाटील यांचे नाव न घेता माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील म्हणाले की, सध्या सर्वत्र भुलभुलय्या सुरू आहे, कर्जाचे हप्ते ज्यांनी भरलेले नाहीत गेल्या वर्षीतील बिले दिलेली नाहीत त्यांनी कारखान्यावर बोलू नये.”

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button