तरंगफळ येथे सद्गुरु श्री संत बाळूमामा मूर्ती स्थापना व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन..

बारामतीच्या करामती फेम ह. भ. प. बाळासाहेब उर्फ भरत शिंदे यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार.
तरंगफळ (बारामती झटका)
तरंगफळ ता. माळशिरस, येथे सद्गुरु श्री संत बाळूमामा मूर्ती स्थापना व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दि. 27/08/2024 रोजी तरंगफळ गावचे थेट जनतेतील लोकनियुक्त माजी सरपंच माऊली कांबळे यांनी केलेले आहे.

सद्गुरु श्री संत बाळूमामा यांच्या मूर्तीची मिरवणूक सकाळी 10 ते 12, मूर्तीची स्थापना 12 वाजून 30 मिनिटे होणार आहे. त्यानंतर दुपारी 01 ते 03 गजी ढोल कार्यक्रम संपन्न होणार आहे. सायंकाळी 04 ते 06 धनगरी ओव्यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सायंकाळी 07 ते 09 या वेळेमध्ये बारामतीच्या करामती फेम असणारे ह. भ. प. बाळासाहेब उर्फ भरत शिंदे यांची कीर्तन सेवा भोलेनाथ सोसायटी, तरंगफळ-गारवाड रोड येथे संपन्न होणार आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे तरंगफळ गावचे थेट जनतेतील लोकनियुक्त माजी सरपंच व कार्यक्रमाचे आयोजक माऊली कांबळे यांनी आवाहन केलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.