खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अकलूज एसटी आगाराला दररोज लाखों रुपयांचा फटका

अकलूज ते पुणे दररोज ऐंशी खासगी वाहने बेकायदेशीर प्रवाशांची वाहतुक करतात
अकलूज आगारातून सोडण्यात येणाऱ्या एसटी बसेसचे दररोज लाखो रुपयांचे उत्पन्न ठप्प
उरुळी कांचन ते स्वारगेट शिवाजीनगर बसस्थानक जाण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागत असल्याने महामंडळ कर्मचारी त्रस्त
श्रीपूर (बारामती झटका)
अकलूज आगाराला दररोज प्रवाशी वाहतुक उत्पन्न तोटा सहन करावा लागत असल्याने अकलूज एसटी चालक वाहक यांना वरिष्ठ अधिकारी यांचेकडून विचारणा होत आहे. उत्पन्न ठप्प होण्याचे कारण अकलूजमधील जवळपास ऐंशी चार चाकी वाहने अकलूज ते पुणे अशी बेकायदा प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यामुळे एसटी प्रवासी यांचा ओढा खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे आहे. या ऐंशी गाड्या पहाटे पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी दहापर्यंत प्रवासी वाहतूक करतात.
अकलूज ते पुणे मार्गावरील सर्व बसथांब्यावर वाहतुक सुरू आहे. विशेष म्हणजे ही खासगी वाहने रस्त्यावर उभी करून प्रवासी घेत असतात, उतरत असतात. त्यामुळे रस्त्यावर रहदारीची कोंडी होते. त्यामुळे उरुळी कांचन, चौफुला ते पुणे, स्वारगेट, शिवाजीनगर पर्यंत प्रचंड रहदारीची कोंडी होत आहे. त्यामुळे एसटी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रहदारीमुळे तीन तास विलंबाने पोहोचावे लागत असल्याचे एसटी चालक वाहक यांनी सांगितले.

बेकायदेशीर प्रवाशांची वहातुक करणाऱ्या खासगी वाहनांवर स्थानिक पोलीस प्रशासन, आरटीओ अधिकारी कारवाई का करत नाहीत, असे एसटी चे कर्मचारी विचारत आहेत. यामागे बेकायदेशीर प्रवाशांची वहातुक करणाऱ्या वाहन चालक मालक यांच्याशी पोलिस आरटीओ अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध लागेबांधे असल्याशिवाय हे होऊ शकते का ? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. अकलूज ते पुणे प्रवासी वाहतूक करणारी ऐंशी वाहने अकलूज, बावडा, इंदापूर व मधल्या बसथांब्यावर प्रवाशांना घेण्यासाठी राजरोसपणे रस्त्यावर उभी असतात, तरी पोलिसांच्या नजरेत ते कसं येत नाही हे हास्यास्पद आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.