चाकोरे ग्रामपंचायतीचे सदस्य ज्येष्ठ नेते सुरेशआबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम…

माळशिरस (बारामती झटका)
चाकोरे ता. माळशिरस, ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य ज्येष्ठ नेते सुरेश आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
बुधवार दि. 4/9/2024 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असे समजून रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते. रक्तदान शिबिरात 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला रक्तदानाचा हक्क बजावला. सर्व रक्तदात्यांचे सुरेश आबा पाटील मित्र परिवाराच्यावतीने मनापासून धन्यवाद देण्यात आले.


रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरता सुरेश आबा पाटील मित्र मंडळातील श्री पाटील, विकी पाटील, मयूर पाटील, बंडू पाटील, नितीन माने, फंटू जाधव, लक्ष्मण मेटकरी, किरण भांगे, डॉक्टर दिग्विजय पाटील, रोहन पाटील, ऋषिकेश पाटील, सुनील भोसले, भीमराव कुंभार, लक्ष्मण शिंदे, महादेव माने, रामचंद्र कस्तुरे, अभिमन्यू गायकवाड, आबा माने, दादासो पाटील, अक्षय पाटील, जयपाल पाटील, संतोष पाटील, सोमनाथ पाटील, गणेश पाटील, सोनू पाटील, फंटू जाधव, ज्योती लोंढे, अक्षय कदम, सनी पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी केला. स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. सुरेश आबा पाटील मित्र मंडळाच्या वतीने सर्वांचे मनापासून धन्यवाद मानण्यात आले.


गुरुवार दि. 5/9/2024 रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा चाकोरे या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना सुरेश आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व खाऊवाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आयोजकांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.