माळशिरस येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

माळशिरस (बारामती झटका)
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत माळशिरस येथे शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट महाराष्ट्र, सोलापूरचे क्लस्टर समन्वयक श्री. समाधान खुपसे व माळशिरस तालुका कृषी अधिकारी श्री. आबासाहेब रुपनवर यांनी शासनाच्या विविध अन्नप्रक्रिया उद्योगविषयी माहिती, आर्थिक मदत, अनुदान, महत्त्व, शेतकऱ्यांना असणाऱ्या समस्या याविषयी मार्गदर्शन केले.


तसेच वाखरी, पंढरपूर एमआयटी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर स्वप्नील शेठ यांनी शेतकऱ्यांना पीक शास्त्र विषय व त्याचे व्यावसायिक कृषी क्षेत्रांमधील असणारे महत्त्व, पीकशास्त्र व अन्न प्रक्रिया उद्योग याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी कृषी विभाग माळशिरस, पंढरपूर येथील संबंधित कर्मचारी व शेतकरी वर्ग उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.