पिलीव येथील श्रीराम गणेश मित्र मंडळ, श्रीराम गल्ली चालू वर्षी सुद्धा अव्वल क्रमांकावर

पिलीव (बारामती झटका) (रघुनाथ देवकर यांजकडून)
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत मंडळाच्या परंपरेप्रमाणे व श्री प्रभू रामचंद्रांच्या आणि श्री गणरायांच्या आणि परमेश्वर व सर्वांच्या आशीर्वादाने नेहमीच श्री गणेशोत्सव काळामध्ये अग्रणी असलेल्या श्रीराम गणेश मित्र मंडळ पिलीव, श्रीराम गल्ली यांनी सन 1962 सालापासून कै. गणेश कृष्णाजी कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या मंडळाच्या माध्यमातून कै. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिप्रेत असलेला श्री गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा टिकवत मंडळाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या विविध शालेय स्पर्धा त्याचप्रमाणे वृक्षारोपण, वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा, साक्षरता अभियान तसेच शासनाने आवाहन केलेल्या सर्व विषयांचा समाविष्ट करीत ग्रामपंचायत, पंचायत समिती माळशिरस, जिल्हा परिषद सोलापूर आणि सांस्कृतिक विभाग मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेने बालविवाह प्रतिबंध, व्यसनमुक्ती व वेगवेगळ्या सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक विषयांवरती सजीव तसेच चित्रफितीद्वारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, सर्व संघटना या सर्व मान्यवरांना आमंत्रित करून वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत त्यावेळीचे तत्कालीन रोजगार हमी योजना मंत्री मा. कै. डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्यामार्फत मंडळाला गौरविण्यात आले होते. तोच वसा घेऊन पिलीव व पिलीव भागातील सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, सहकारी संस्था, धार्मिक संस्था, आसपासची सर्व तरुण मंडळे, सामाजिक संघटना व सर्व गणेश भक्तांच्या सहकार्याने चालू वर्षीसुद्धा श्रीराम गणेश मित्र मंडळाने भजन, कीर्तन तसेच धकाधकीच्या जीवनामध्ये काळाची गरज ओळखून सर्वांचे आरोग्य, सुख, समाधान राहण्यासाठी मेडिटेशनचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ तयार करून श्री गणेशोत्सव साजरा करण्यात आला व सुरू आहे.

सदर मंडळाला नेहमीच सहकार्य लाभत असते. त्यामुळे आमचे मंडळ स्वयंस्फूर्तीने व सर्व नियमांचे व अटींचे पालन करून वाटचाल करीत असल्याचे या ठिकाणी सतीश कस्तुरे, स्वप्निल कुलकर्णी, विजय देवकर, विजय भागवत, लक्ष्मण इंगळे, प्रसाद कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी, विकास देवकर, अनिल कोल्हटकर, ओंकार जोशी, अविनाश स्वामी, नानासाहेब जगदाळे, बंडू रजपूत व सर्व सभासद बांधवांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तसेच आमच्या मंडळाला सोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि सर्वच संघटनांचे गटातटाचे मार्गदर्शन लाभलेले आहे. तसेच खास करून कै. जयसिंगराव जहागीरदार, कै. अजितसिंह जहागीरदार, माधवराव पाटील, गोविंदराव पाटील, हरिभाऊ कपने, आबासाहेब शेंडगे, सूर्याजीराव जहागीरदार, जयंतराव बगाडे सर, शरदभाई कालेकर, रणजीतसिंह जहागीरदार, कै. माजी आमदार बाबुरावजी देशमुख, माजी सभापती सूर्यकांतदादा माने देशमुख यांनीही मोलाचे सहकार्य केलेले आहे.
तसेच या मंडळास खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जि. प. माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार, सुभाषराव पाटील, माजी शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्ष कल्याण काळे पंढरपूर, दीपकआबा साळुंखे सांगोला तसेच पिलीव ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रकाश घाटे, लक्ष्मण भैस, पुष्पाताई लोखंडे, साधना बोडरे, अमोल मदने, संग्राम पाटील, नितीन मोहिते व अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेटी देऊन आम्हाला सहकार्य केले असल्याचे जुने सहकारी संभाजीराव जहागीरदार शिवाजीराव इंगळे यांनी सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.