मांडवे गावचे १६ वे बिनविरोध सरपंचपदी रितेशभैया बबनराव पालवे यांची निवड…

मांडवे (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी ग्रामपंचायत व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असणारी मांडवे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. शितल अर्जुन दुधाळ यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिलेला आहे. १६ वे सरपंच कोण होणार ?, ही उत्सुकता लागलेली होती. माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंततात्या पालवे व माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बबनबापू पालवे गटाचे सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध होऊन श्री. रितेशभैया बबनराव पालवे व सौ. अश्विनी गजानन पालवे यांचा पूरक अर्ज आलेला आहे. सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आलेला असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बिनविरोध सरपंच पदी निवड होण्याची औपचारिक घोषणा राहिलेली आहे.
मांडवे ग्रामपंचायतीमध्ये श्री. हनुमंत भीमराव टेळे, सौ. स्वाती राजेंद्र शिंदे, सौ. शितल अर्जुन दुधाळ, सौ. स्वाती तानाजी दुधाळ, श्री. तात्याबा पांडुरंग शिंदे, श्री. सुरज दिनकर साळुंखे, सौ. बाळाबाई सुनील खुडे, श्री. विठ्ठल ज्ञानेश्वर पालवे, सौ. अश्विनी गजानन पालवे, सौ. हसीना रफिक मुलाणी, श्री. रितेश बबनराव पालवे, सौ. शोभा नाथा सिद, श्री. तानाजी जगन्नाथ पालवे, कु. पंचशीला रामचंद्र गायकवाड, सौ. मनीषा कुमार पाटील, सौ. आनंदीबाई शिवाजी ढोबळे, सौ. मालन बबन खोमणे असे १७ ग्रामपंचायत सदस्य आहेत. या सदस्यांपैकी १६ वे बिनविरोध सरपंच कोण होणार ?, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
मांडवे ग्रामपंचायतीची स्थापना १९५२ साली झालेली आहे. आत्तापर्यंत मांडवे ग्रामपंचायतीला सरपंच लाभलेले आहेत – श्री. रघुनाथ रामचंद्र कुलकर्णी 1952 ते 72, श्री. धर्माजी संभाजी साळुंखे 1972 ते 1977, श्री. बबन गणपत पालवे 1977 ते 1980, श्री. शिवाजी रावजी पाटील 1980 ते 1983, श्री. गजानन गोविंद साळुंखे 1983 ते 1988, श्री. जयवंत मारुती पालवे 1988 ते 2005, सौ. अरुणा भीमराव गायकवाड 2005 ते 2008, श्री. हरिचंद्र बाजी ढोबळे 2009 ते 2010, श्री. तानाजी जगन्नाथ पालवे 2010 ते 2011, श्री. ज्ञानेश्वर दादा पालवे 2012 ते 2014, श्री. राहुल भीमराव दुधाळ 2014 ते 2015, सौ. धनश्री तानाजी पालवे 2015 ते 2018, सौ. मनीषा कुमार पाटील 2018 ते 2020, श्री. हनुमंत भीमराव टिळे 2021 ते2023, सौ. शितल अर्जुन दुधाळ 2023 ते 2024, असा १५ सरपंच पदाचा कार्यकाल झालेला आहे. १६ वे सरपंच रितेशभैया बबनराव पालवे झालेले आहेत. 1977 साली सरपंच पदाची धुरा सांभाळून माळशिरस पंचायत समितीचे सदस्य पदावर काम केलेले बबनबापू पालवे यांचे चिरंजीव रितेशभैया पालवे ४७ वर्षांनी बिनविरोध सरपंच झालेले आहेत.
गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून सर्व एकत्र येवून गावामध्ये विकासाच्या दृष्टीने विकासकामे चालू आहेत. सरपंच पद देखील बिनविरोध झालेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.