ॲड. पी. इ. कुलकर्णी उर्फ दादा यांना दिलीप फाउंडेशन पुरस्कार समितीच्या वतीने विधीज्ञ पुरस्कार प्रदान

माळशिरस (बारामती झटका)
ॲड. प्रभाकर एकनाथ कुलकर्णी उर्फ पी. इ. दादा यांना सोलापूर येथील दिलीप फाउंडेशन पुरस्कार समितीच्या वतीने विधिज्ञ पुरस्कार मिळाला आहे.
ॲड. पि. इ. कुलकर्णी उर्फ दादा यांचा जन्म पंढरपुर येथे झाला. त्यांचे ११ वी पर्यंतचे शिक्षण पंढरपुर येथेच आपटे हायस्कुलमध्ये झाले. त्यानंतर फलटण येथे दोन वर्षे मुधोजी कॉलेजमध्ये शिक्षण घेवुन सांगली येथील विलींगडन कॉलेज येथे सन १९६४ साली बी. ए. पर्यंतचे शिक्षण झाले. त्यावेळी दादा विलींगडन कॉलेजमध्ये आर्ट सोसायटीचे जनरल सेक्रेटरी व कॉलेजचे जनरल सेक्रेटरी होते. तसेच एन.सी.सी. मध्ये अंडर ऑफिसर होतो. त्यानंतर मुंबई येथे डिप्लोमा इन लेबर वेलफेअर हा मुंबई विदयापीठाचा कोर्स केला. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील दोन-तीन कारखान्यात पर्सोनेल ऑफिसर म्हणुन नोकरी केली. नोकरी करत असताना एल.एल.बी. मुंबई विदयापीठाची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडुन दिली व मुंबई येथे हायकोर्टामध्ये ना.पी.एस. शहा माजी हायकोर्ट जज यांचेकडे दोन वर्षे प्रॅक्टीस केली.
त्यानंतर दादांनी माळशिरस येथे १९७२ साली वकिलीचा व्यवसाय सुरु केला. त्यावेळी माळशिरस कोर्टात फक्त १३ वकील होते. त्यापैकी ५-६ वकिलच रेग्युलर प्रॅक्टीस करीत होते. आता त्या जुन्या वकिलांपैकीच फक्त २ वकिलच प्रॉक्टीस करत आहेत. त्यांनी माळशिरस येथील बार असोसिएशनच्या १९९१-९२ साली अध्यक्ष पदावर देखील काम केले आहे.
दादांनी माळशिरस तालुक्याचे सन १९७७-७८ साली जनता पक्षाचा अध्यक्ष व सेक्रेटरी पदावर काम केलेले आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्ष स्थापन झाल्यावर १९८० साली भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुक्याचे अध्यक्ष व सेक्रेटरी म्हणून काम केलेले आहे. दादांनी पालखी महामार्ग संघर्ष समिती स्थापन करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः खर्च करून स्वतः वेळ देऊन स्वतः पाठपुरावा करून असे महान काम केलेले आहे. तसेच तसेच लहान मुलांसाठी बालोद्यान स्वतःच्या जागेत सुरु केले आहे. दादांनी ज्येष्ठ नागरी संघटना माळशिरस येथे सुरु केली असून त्या संघटनेचे संस्थापक आहेत.

पुर्वी माळशिरस येथे १५ दिवसाचे कोर्ट होते. पुढे १९५३ पासून कायमचे कोर्ट झाले. त्यावेळी फक्त एक न्यायधिश होते व आज कोर्टाची प्रगती होवून चार Jr. Division court, दोन Senior Division व तसेच दोन Additional district court स्थापन झालेले आहे.
हया सर्व घटनेचे साक्षिदार असल्याचा अभिमान वाटतो व उत्तरोत्तर माळशिरस कोर्टाची अशीच प्रगती, वाढ व्हावी अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच दिलीप फाऊंडेशन पुरस्कार समितीने पुरस्कार दिल्याबददल समितीचे आभारही मानले आहेत. आजपर्यत माझ्या वकिली व्यवसायाला ५४ वर्ष होत आहेत व देव कृपेने मी अजून कोर्टात पुर्वीप्रमाणेच कार्यरत आहे. हे सर्व मी पक्षकारांच्या विश्वासाने व तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे मी करु शकलो, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.