माळशिरस तालुक्यातील संरक्षित शेतीमधील एक एकराचे अनुदानीत शेडनेट हाऊसची तपासणी
माळशिरस (बारामती झटका)
राष्ट्रीय कृषी विकास योजना सन 2023-2024 अंतर्गत संरक्षित शेतीमधील श्री. अनिल नामदेव निगडे यांचे मौजे धर्मपुरी, ता. माळशिरस येथील गट क्र. 188 मधील 46 x 88 मीटर आकारमानाचे 4088 चौ.मी. फ्लॅट शेडनेट गृह / हाऊसची तपासणी दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी श्री. बाळासाहेब लांडगे सर उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर यांनी केली.
तपासणी करत असताना जास्त मूल्य असणाऱ्या व्यापारी पिकाची लागवड करावी व लागवड अगोदर जमीन व पाण्याचे परीक्षण करून घ्यावे व त्याद्वारे एकात्मिक अन्नद्रव्यवस्थापन करण्याचे मार्गदर्शन केले. तपासणी दरम्यान शेडनेट गृहाची उभारणी मार्गदर्शक सूचनेप्रमाणे उत्तम दर्जाचे साहित्य वापरून केल्याने समाधान व्यक्त केले. तपासणी दरम्यान तालुका कृषी अधिकारी माळशिरस आबासाहेब रुपनवर यांनी एकात्मिक फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत संरक्षित शेती व घटक व बाबीसाठी भरीव अनुदानाची तरतूद असल्याने शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
मंडल कृषी अधिकारी श्री. सतीश कचरे यांना तपासणी प्रक्षेत्र भेट शेडनेट गृहमध्ये मल्चिंग पेपरवर लागवड करण्यास वाव असून या बाबीच्या अनुदानासाठी ॲग्री महाडीबीटीवर मल्चिंग पेपर यासाठी अर्ज करण्याचे मार्गदर्शन केले. सदर प्रक्षेत्र भेट तपासणी वेळी लाभार्थी शेतकरी, प्रगतशील शेतकरी, शेडनेट गृह उभारणी करणारे ठेकेदार, धर्मपुरीचे कृषी सहाय्यक श्री. नाळे, मोरोची कृषी सहाय्यक श्री. कर्णे, नातेपुते कृषी पर्यवेक्षक श्री. पांढरे व श्री. साळुंखे यांनी उपस्थिती दर्शविली व तपासणी कामे सहकार्य केले. लाभार्थी शेतकऱ्यांनी शेडनेट ग्रुपची तपासणी व अनुदान गणतीबाबत कृषी विभागाने दिलेल्या शीघ्र प्रतिसादाबाबत आभार व्यक्त केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.