चतुर्थ श्रेणीसाठी कोतवालांची राज्यात बेमुदत संपाची हाक

चतुर्थ श्रेणीबाबत सरकारचा दुटप्पीपणा
मागण्या मान्य न झाल्यास 26 तारखेपासून मुंबईत आझाद मैदानावर करणार आंदोलन
सोलापूर (बारामती झटका)
राज्यातील कोतवालांनी चतुर्थचा दर्जा आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आक्रमक भूमिका घेतली असून मंगळवार दि. 24 पासून राज्यभरात जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 25 तारखेपासून राज्यभर काम बंद आंदोलन सुरू करण्यात येणार असून गुरुवारपासून दि. 26 पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. महसूल प्रशासनातील कोतवाल महत्त्वाचे घटक आहेत. महसूल गोळा करणे, निवडणूक प्रक्रियेत व स्थानिक पातळीवरील नित्य नियमाची कामे पार पाडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अशा विविध जबाबदाऱ्या पार पडत असून कोतवालांना अद्यापपर्यंत चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळाला नाही. त्यामुळे त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आणि सुविधा मिळत नाही. कोतवाल संघटनेच्या माहितीनुसार या मागण्यावर कोणतीही प्रभावी कारवाई झाली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील हजारो कोतवाले आंदोलनात सहभागी होणार असून आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू असणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव यांनी दिली.
कोतवाल हा महसूल यंत्रणेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मात्र, कोतवालांना अद्याप चतुर्थ श्रेणी प्राप्त झालेली नाही. यासाठी मंगळवारपासून सोलापूर जिल्हा कोतवाल संघटनेने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. येत्या मंगळवारी 24 रोजी जिल्हा परिषद येथील पूनम गेट येथे एकदिवशी धरणे आंदोलन, त्यानंतर बुधवारी 25 पासून राज्यभरात काम बंद आंदोलन करणार असून, जर या दोन दिवसात शासनाने दाखल न घेतल्यास दि. 26 पासून मुंबई येथील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात येणार आहे.
कोतवाल महसूल विभागातील शेवटचा भाग आहे. तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन प्रत्येकाच्या शंकेचे निरसन करणे, महसूल गोळा करणे, गौणखनीज आळा बसविणे, निवडणूक कामकाज, नैसर्गिक आपत्ती, पीक पाणी, दुष्काळात नुकसान भरपाई, पंचनामाचे सर्वेक्षण करणे, स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पोलीस पाटील व पोलीस प्रशासनास मदत करणे, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांना सहाय्य करणे अशा अनेक कामकाजात कोतवाल हा अत्यंत महत्त्वाचा घटक समजला जातो. मात्र, हा कोतवाल साठ वर्षापासून चतुर्थ श्रेणीसाठी सतत झगडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री यांनी तातडीने बैठक घेऊन कोतवालांचा विषय निघाली काढावा अन्यथा, होणाऱ्या नुकसानास राज्य शासन स्वतः जबाबदार राहणार आहे. त्यामुळे तातडीने बैठक घेऊन गेल्या पन्नास वर्षांपासूनच्या मागणीचा निर्णय व्हावा, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
मागण्या :
1) कोतवाल कर्मचारी चतुर्थी श्रेणी दर्जा मिळावा.
2) कोतवाल पदनाम बदलून महसूल सेवक करावा.
3) कोतवाल कर्मचारी यांना अनुकंपा लागु करण्याबाबत.
4) कोतवाल कर्मचारी यांना तत्सम पदामध्ये महसूल सहाय्यक, तलाठीमध्ये पदोन्नती मिळण्याबाबत.
5) कोतवाल कर्मचारी भविष्य निर्वाह मिळण्याबाबत.
6) कोतवाल कर्मचारी प्रवास भत्ताबाबत.
7) पदोन्नती वयाची अट रद्द करून सेवा जेष्ठता यादीप्रमाणे पदोन्नती बाबत.
8) कोतवाल कर्मचारी अर्जित रजा वाढ करण्याबाबत.
9) कोरोनामध्ये मयत कोतवाल कर्मचारी वारसदार तात्काळ नियुक्ती करण्याबाबत
वरील मागण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची महिती कोतवाल राज्य संघटनेचे नेते शिवप्रसाद देवणे, नामदेव शिंदे, सोमनाथ गवळी, विठ्ठल गुरव, रोशन जोगे यांनी दिली आहे. या आंदोलन यशस्वीतेसाठी जिल्हा अध्यक्ष विठ्ठल गुरव, कृष्णा शिंदे, बाळासाहेब सरवदे, अनिल जाधव, मलिनाथ बाळगी, राहुल तोडकरी, भगवान पारशी, गोरख ढोबळे, प्रल्हाद खरे, बसवंत सुतार, अवधुत पुजारी, गुरुदास आरणे, भागवंत चंदनशिवे, प्रवीण गुजले, नवनाथ इंगोले, बंदेनवाज डफेदार, संजय कुरवडे, उमेश क्षिरसागर, अर्जुन सनके, शहाजी हुलगे, धानया हिरेमठ, गौतम ठोकळे, राजेंद्र कुंभार, बंडु मडवळकर, शफीक वाडीकर, इरणा कांबळे, बालाजी व्हळे, देवा सावंत, अनिल भोसले, नाना पवार, जालिंदर वाघंबरे, समाधान सुरयंगध, दत्ता कदम, शिवानंद कोळी, शंकर बनसोडे, अकुंश मुंढे, पांडुरंग वाघमारे, कृष्णा इंगळे, महादेव खिलारे, श्रीशैल हाके, रशीद शेख, सुदर्शन गुरव, जगदीश देसाई, गुलाब सोनवणे, गणेश पवार, नवनाथ इंगोले, संजय कुरवडे, नवनाथ गजगे, जावीर मुलाणी, शिवशरण कोळी, सुरेश रामपुरे, शिवानंद कोळी, रेवण सुतार, सुनील हुलगे, स्वामीनाथ आलुरे, सुलोचना देशमुख, गुरुदेवी चौधरी, रेणुका कोळी, सुचिता काळे, ममता कोळी, अबुबाई चव्हाण, वनिता कुंभार, लक्ष्मी लाड, कविता चव्हाण, दिपाली स्वामी, अश्विनी गायकवाड, सरोजिनी कोळी, ऐश्वर्या कांबळे, रेशमा वाघमारे, सुलोचना अदलिंगे, मनिषा शिंदे आदींसह इतर महिला पदाधिकारी, कोतवाल कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहे. इतर पदाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील ५४७ कोतवाल हे आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव यांनी दिली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.