आरोग्यताज्या बातम्या

अकलूज येथे अस्थी रोग व मणक्याचे विकार शिबीर संपन्न.

संग्रामनगर (बारामती झटका) (केदार लोहकरे यांजकडून)

संग्रामनगर-अकलूज ता. माळशिरस, येथे पुण्यातील संचेती, अकलूजच्या अश्विनी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने अश्विनी हाॅस्पिटल येथे अस्थी रोग व मणके विकार शिबीर संपन्न झाले. या मोफत निदान व उपचार शिबिरात ७२९ रुग्णांनी लाभ घेतला.

अकलूज येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. पराग संचेती म्हणाले की, स्वतःची प्रकृती चांगली असेल तरच आपण परिवाराची काळजी घेऊ शकतो. रोजच्या जीवनातही तज्ञ डाॅक्टरांकडून वेळीच तपासण्या करून घेऊन योग्य आहार घेत वजन नियंत्रीत ठेवल्यास गुडघे व मणक्यांचे दुखण्यापासून मुक्तता मिळु शकते. मात्र, दुर्लक्ष करण्याने हे आजार बळावतात.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना डाॅ. एम. के. इनामदार म्हणाले की, कोणत्याही आजाराचे अचुक निदान झाले व वेळेवर उपचार केले तर पुढे त्रासदायक ठरत नाही. उपचार घेण्याची सर्वांची परिस्थिती नसते, अशा शिबीरातून उपचाराची संधी मिळते, त्याचा लाभ घेतला पाहिजे. संचेती हाॅस्पिटलने ग्रामीण भागात हे शिबीर आयोजित करुन रुग्णसेवेचा वसा जोपासला असल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना मणकाविकार तज्ञ डाॅ. अभिनव भुसे म्हणाले की, घराघरात गुडघेदुखी व मणक्यांच्या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. तरुण पिढीतही अस्थिरोग वाढत चालला आहे. व्यायामाचा अभाव, व्यवस्थित झोप न घेणे, आहारातील फास्टफुडचे प्रमाण यासाठी कारणीभुत आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा आरोग्य विमा उतरवणे महत्वाचे असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी माळशिरसचे तहसील सुरेश शेजुळ, मणका विकार तज्ञ डाॅ. अभिनव भुसे, इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय सिद, सचिव डॉ. निखिल मिसाळ, डॉ. रावसाहेब गुळवे आदी उपस्थित होते.

सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत चाललेल्या या शिबिरात संचेती हॉस्पिटलचे तज्ञ डाॅ. पराग संचेती, डॉ. अभिनव भुसे, डॉ. प्रदिप बोद्रे, डाॅ. अमीत वाकेकर, डॉ. जय चाकोरे, डॉ. अभिषेक वाळवी यांनी ७२९ रुग्णांच्या अस्थिरोग व मणक्याच्या आजारावरील तपासण्या करुन प्रथमोपचार व पुढील मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सुधीर पोफळे यांनी केले तर आभार डॉ. आनंद बस्ते यांनी मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

5 Comments

  1. قنوات الكهرباء PVC يفخر مصنع إيليت بايب في العراق بتقديم قنوات الكهرباء PVC عالية الجودة المصممة لإدارة الكابلات بكفاءة وموثوقية. تتميز قنوات PVC الخاصة بنا بخفة الوزن والمتانة، مما يوفر حماية ممتازة للأسلاك الكهربائية ضد الأضرار الميكانيكية والظروف البيئية. مثالية للتطبيقات السكنية والتجارية، تضمن هذه القنوات تركيبًا آمنًا ومنظمًا. كأحد أكثر المصانع موثوقية في العراق، يلتزم مصنع إيليت بايب بإنتاج قنوات PVC الكهربائية التي تلتزم بأعلى معايير الجودة. قم بزيارة موقعنا لمعرفة المزيد: elitepipeiraq.com.

  2. أنابيب الكوروجيت مزدوجة الجدار (DWC) في العراق يعتبر مصنع إيليت بايب في العراق من أبرز منتجي أنابيب الكوروجيت مزدوجة الجدار (DWC)، والمعروفة بقوتها العالية وتصميمها الخفيف الوزن. تتميز هذه الأنابيب بهيكل مبتكر مزدوج الجدار يوفر مقاومة معززة للصدمات والضغط الخارجي، مما يجعلها مثالية لمجموعة متنوعة من التطبيقات، بما في ذلك أنظمة الصرف الصحي ومشاريع الصرف. تضمن تقنيات الإنتاج المتقدمة في مصنع إيليت بايب أن أنابيب DWC لدينا تلبي معايير الجودة الصارمة، وتقدم أداء استثنائياً وطول عمر. كواحدة من أفضل وأهم المصانع في العراق، نحن ملتزمون بتقديم منتجات عالية الجودة يمكن لعملائنا الاعتماد عليها. لمزيد من التفاصيل حول أنابيب الكوروجيت مزدوجة الجدار، تفضل بزيارة elitepipeiraq.com.

  3. I loved as much as youll receive carried out right here The sketch is attractive your authored material stylish nonetheless you command get bought an nervousness over that you wish be delivering the following unwell unquestionably come more formerly again as exactly the same nearly a lot often inside case you shield this hike

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button