सभासद व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे पतसंस्थेची प्रगती – सुभाष गांधी

खंडाळी (बारामती झटका)
सभासद व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे पतसंस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचे प्रतीपादन निर्मल ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था खंडाळी ता. माळशिरसचे चेअरमन सुभाष गांधी यांनी केले. प्रथम सरस्वती व संस्थेचे प्रेरणास्थान कै. उत्तमचंद (दादा) गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन चेअरमन व संचालकांच्या हस्ते करण्यात आले.

पुढे बोलताना चेअरमन म्हणाले की, पतसंस्थेची ही ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा असून संस्थेला चालू वर्षांमध्ये नऊ लाखाहून अधिक नफा झाला आहे. तसेच संस्थेने एक कोटी चौऱ्याहत्तर लाख कर्ज वाटप केले. संस्थेकडे ठेवी एक कोटी सत्याहत्तर लाखाच्या आहेत. सभासदांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते नियमित भरले तर कोणतेही पतसंस्था तोट्यात येत नाही. सभासदांना 10% लाभांश देण्यात येणार आहे.


पतसंस्थेचे सचिव श्रीमंत कानगुडे यांनी अहवाल वाचन केले. संस्थेला ऑडिट वर्ग अ मिळाला असून पतसंस्थेच्या यशामध्ये सभासदांचे मोलाचे सहकार्य आहे. यापुढील काळातील असे सहकार्य करावे असे सांगितले. पतसंस्थेच्या वतीने सभासदांना चार्जिंगवरील बॅटरी भेट देण्यात आली. एकतीसावी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. वार्षिक सर्वसाधारण सभेत पतसंस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.