स्वर्गीय सौ. चंद्रकला बाबुराव जाधव यांचा दशक्रिया विधी मळोली येथे होणार आहे.

मळोली (बारामती झटका)
स्वर्गीय सौ. चंद्रकला बाबुराव जाधव यांचा दशक्रिया विधी मळोली ता. माळशिरस, येथील दर्गा या ठिकाणी शुक्रवार दि. 27/09/2024 रोजी सकाळी नऊ वाजता दशक्रिया विधी कार्यक्रम होणार आहे.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी मुख्य शेतकी अधिकारी मळोली गावचे श्री. बाबुराव रावसाहेब जाधव यांच्या धर्मपत्नी व श्री. धैर्यशील बाबुराव जाधव वर्कर्स मॅनेजर व श्री. डॉ. उदयसिंह उर्फ बाळासाहेब बाबुराव जाधव यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. चंद्रकला बाबुराव जाधव यांचे बुधवार दि. 18/09/2024 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते. डॉ. उदयसिंह बाबुराव जाधव यांचे महूद येथे जाधव हॉस्पिटल आहे. सदरच्या ठिकाणी जाधव परिवार वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांच्यावर महूद ता. सांगोला, येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार व रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम करण्यात आले होते.
दशक्रिया विधी मूळ गावी मळोली ता. माळशिरस, या ठिकाणी होणार आहे. तर उत्तरकार्य तेरावा दिवस सोमवार दि. 30/09/2024 रोजी महुद बुद्रुक ता. सांगोला, येथील राहत्या निवासस्थानी जाधव हॉस्पिटल येथे होणार आहे, याची मित्रपरिवार व नातेवाईक यांनी नोंद घ्यावी, असे श्री. बाबुराव रावसाहेब जाधव, श्री. धैर्यशील बाबुराव जाधव, श्री. डॉ. उदयसिंह बाबुराव जाधव आणि समस्त जाधव परिवार मळोली यांच्या वतीने कळविण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.