मळोली विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सभा संपन्न

मळोली (बारामती झटका)
मळोली ता. माळशिरस येथील मळोली विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी संस्थेचे संस्थापक ॲड. कै. जयसिंगराव जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या सभेच्यावेळी संस्थेचे मार्गदर्शक पंचायत समितीचे सदस्य श्री. रणजितसिंह जाधव, संस्थेचे चेअरमन श्री. सत्यजितभैया जाधव, व्हाईस चेअरमन श्री. मनोजकुमार जाधव उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे सेक्रेटरी श्री. दिपक माळवदकर यांनी संस्थेच्या वार्षिक कामकाजाचे वाचन केले. संस्थेस मिळालेल्या वार्षिक नफ्यातून राखीव निधी, सभासद लाभांश, इमारत निधी व कामगार बोनस या नफ्याचे वर्गीकरण करून यातील इमारत निधी, राखीव निधी व सभासद लाभांश दहा असे टक्के या प्रमाने नफा विभागणी करण्यात आली. संस्थेचे एकूण ७१२ सभासद असून यातील २८३ सभासद कर्जदार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. सत्यजित जाधव हे होते.
यावेळी गावातील ऊस पिकात एकरी जास्तीत जास्त उत्पादन घेतल्याबद्दल श्री. मोहन मच्छिंद्र पवार यांचा संस्थेच्या वतीने संस्थेचे मार्गदर्शक श्री. रणजितसिंह जाधव व संस्थेचे अध्यक्ष श्री. सत्यजितभैया जाधव यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव पाटील, मनोजकुमार जाधव, सुरेशदादा जाधव, माजी सरपंच श्री. गणेश पाटील, प्रभाकर इंगळे, संभाजी जाधव, दत्तात्रय महाडिक, युवराज काळे, राजाभाऊ जाधव, कल्याण जाधव, विकास जाधव, श्रावण वाघमारे, विलास महाडिक, सुखदेव शिंदे, गोरख गुजर, मिलिंद जाधव, आप्पासो जाधव, पांडुरंग जाधव, उमेश जाधव, शंकर ढेबरे, अशोक वाघमारे, भागवत जाधव यांच्यासह संस्थेचे सर्व सभासद व हितचिंतक उपस्थित होते. सभा संपन्न झाल्यानंतर सर्वांना चहा व नाष्टा देण्यात आला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.