जिद्द, चिकाटी व परिश्रमच्या जोरावर पत्रकाराचा मुलगा डॉक्टर झाला.

गरिबीवर मात करत डॉक्टर झाल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
संग्रामनगर (बारामती झटका) (केदार लोहकरे यांजकडून)
माळशिरस तालुक्यात सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन सावन शिवाजी पालवे यांने डॉक्टर होण्याचे स्वप्न सत्यात उतरविले आहे.
अकलूज येथील पत्रकार शिवाजी पालवे यांचा मुलगा सावन पालवे याने नुकतेच दंत वैद्यकीय अभ्यासक्रम यशस्वीपणे पुर्ण करीत डॉक्टर पदवी संपादन केली. त्याने अहमदनगर येथील श्री. यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज अँड हाॅस्पिटल या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बी.डी.एस. (बॅचलर आफ डेंटल सर्जन) वर्ष २०१९ साली प्रवेश घेतला होता. आज त्यांच्या बरोबर ८३ विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम यशस्वीपणे पुर्ण केला. त्यामुळे संजोग लान्स येथे आयोजित केलेल्या १४ व्या दिक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे आणि प्राध्यापक, डॉक्टर निखिल बोंबाळे, डॉ. राहुल आनंद, डॉ. आराध्या यांच्या हस्ते सर्वांना गौरवपत्र देवुन सन्मानीत करण्यात आले.
सावन पालवे हा पुर्व प्राथमिक पासूनच अत्यंत हुशार व तल्लख बुध्दीमत्तेचा होता. त्याने डॉक्टर होण्यासाठी खूप कष्ट व मेहनत घेतली आहे. सावन हा अकलूज येथील पत्रकार शिवाजी पालवे यांचा मुलगा आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना परिस्थितीवर मात करुन सावन याने जिद्द, आत्मविश्वास आणि कठोर परीश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. मनात जिद्द व चिकाटी असेल तर यशस्वी होण्यापासून कोणीही रोखु शकत नाही, हे आपल्या नेत्रदिपक यशाने दाखवुन दिले.

डॉ. सावन पालवे याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शंकररनगरच्या महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला येथे झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय अकलूज व लोकविकास इंग्लिश मिडियम स्कुल, वेळापुर येथे झाले होते. डॉक्टर सावन पालवे याने मिळविलेल्या यशाबद्दल सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते-पाटील यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आपल्या सहकारी एका पत्रकाराचा मुलगा डॉक्टर झाल्याचा आनंद माळशिरस तालुक्यातील सर्व पत्रकारांनी, मित्र मंडळींनी व्यक्त करीत त्याचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.