अकलूजच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पुणे विभागीय क्रीडा स्पर्धेत सुयश.

अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस, येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्राने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्राच्या क्रीडा महोत्सवात विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्र यांच्यावतीने यावर्षी इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात विभागीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवामध्ये अकलूज अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात यश संपादन केले. यामध्ये महेश महादेव जाधव (भालाफेक), कु. भाग्यश्री विठ्ठल काळे हिने (१०० मीटर) धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. सर्व विजेत्या स्पर्धकांना पुणे विभागीय केंद्राचे संचालक संतोष वामन यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
महेश जाधव (भालाफेक) व कु.भाग्यश्री काळे (१०० मीटर धावणे, खो-खो) या दोन विद्यार्थ्यांबरोबर अरबाज आतार (हॉलीबॉल व खो-खो), प्रणित पाटील व निखिल कोळी (खो-खो) यांची नाशिक येथे होणाऱ्या केंद्रीय क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

या क्रीडा महोत्सवातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक जयसिंह मोहिते पाटील, संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर व अभ्यास केंद्राचे संयोजक डॉ. बाळासाहेब मुळीक यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.