ताज्या बातम्या

नूतन गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांचा विविध संघटनाच्या वतीने सत्कार

वाघोली (बारामती झटका)

पंचायत समिती माळशिरस इथे नुकतेच हजर झालेले नूतन गटविकास अधिकारी डॉ. श्री. आबासाहेब पवार यांचा आज दि. ९ रोजी सकाळी माळशिरस पंचायत समितीच्या त्यांच्या कार्यालयात माळशिरस तालुका जिल्हा परिषद सेवकांची पतसंस्था मर्यादित माळशिरस, मराठा सेवा संघ तालुका शाखा माळशिरस, सोलापूर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्था पंढरपूर, तसेच ग्रामसेवक संघटनेच्या वतीने स्वागतपर सत्कार करण्यात आला. सदर वेळी मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य उत्तमराव माने, पतसंस्थेचे चेअरमन श्री. रवींद्र पवार, व्हाईस चेअरमन डॉ. विकास तांबडे, संचालक अशोकराव रणनवरे, महेंद्र बुगड, ग्रामसेवक पतसंस्थेचे संचालक श्री. व्ही. टी. बाबर, ग्रामसेवक संघटनेचे श्री. पी. बी. काळे, एस. एस. गोरे भाऊसाहेब, श्री. पी. बी. सूर्यवंशी, वरीष्ठ सहाय्यक एस. व्ही. गिराम साहेब, बापूराव माने आदी कर्मचारी उपस्थित होते.

सदर वेळी मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उत्तमराव माने यांनी मराठा सेवा संघ, जि. प. सेवक पतसंस्था यांचे विषयी थोडक्यात माहिती सादर केली. आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.

सदर सत्काराबद्दल डॉ. गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी समाधान व्यक्त करून पंचायत समिती माळशिरसचा कारभार सर्व कर्मचारी संघटना, कर्मचारी यांना विश्वासात घेऊन तसेच सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याविषयी योग्य ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री. राजेंद्र मिसाळ यांनी करून चेअरमन रवींद्र पवार यांनी आभार मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button