ताज्या बातम्याशैक्षणिक

मुलींनी शालेय जीवनात आनंददायी शिक्षण घेतले पाहिजे – कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील.

गृहविज्ञान महिला महाविद्यालयात बक्षीस वितरण समारंभ संपन्न.

अकलूज (बारामती झटका)

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील या होत्या तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे हे होते. याप्रसंगी शैक्षणिक, कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा यशाबद्दल प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या की, मुलींनी चांगल्या किंवा वाईट परिस्थीतीत तटस्थपणे विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थिनींनी आनंददायी शिक्षण घेणे गरजेचे आहे. प्रत्येक मुलीने केवळ चूल आणि मूल एवढाच विचार न करता स्वतः आर्थिक स्वावलंबी होणे गरजेचे आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राहुल सुर्वे यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. छाया भिसे यांनी केले.

गुणवंत विद्यार्थीनी कु. प्रणाली फडतरे (बी.एस्सी.) गृहविज्ञान विभागात एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठात (प्रथम क्रमांक), कु. अमृता देशमुख (युवा महोत्सव – वादविवाद स्पर्धा – (तृतीय क्रमांक), कु. जागृती ऐवळे (युवा महोत्सव – हिंदी वक्तृत्व स्पर्धा (द्वितीय क्रमांक), कु. अमृता मगर (युवा महोत्सव मराठी वक्तृत्व स्पर्धा (द्वितीय क्रमांक) व मराठी काव्य वाचन तृतीय क्रमांक), कु. श्रद्धा इटकर (युवा महोत्सव – हिंदी वाद विवाद स्पर्धा (तृतीय क्रमांक), कु. धनश्री बनसोडे रांगोळी व मेहंदी स्पर्धा (प्रथम क्रमांक), कु. प्रिती व्यवहारे प्रश्न मंजुषा स्पर्धा (प्रथम क्रमांक), कु. करिश्मा कर्चे पोस्टर मेकिंग स्पर्धा (प्रथम क्रमांक), कु. प्राची गायकवाड नृत्य स्पर्धा (प्रथम क्रमांक), कु. भक्ती पवार गीत गायन स्पर्धा (प्रथम क्रमांक), कु. आकांक्षा फराडे प्रश्न मंजुषा स्पर्धा (प्रथम क्रमांक), कु. मदिहा बागवान खाना खजाना स्पर्धा (प्रथम क्रमांक), कु. जान्हवी पवार फोटोग्राफी स्पर्धा (प्रथम क्रमांक), कु. नेहा गायकवाड अंताक्षरी स्पर्धा (प्रथम क्रमांक), कु. संचिता दिक्षित (एन. एस. एस. बेस्ट व्हालेंटियर), कु. करिष्मा कर्चे (उत्कृष्ट ग्रंथालय वाचक), कु. श्रद्धा इटकर (बेस्ट स्टूडंट ऑफ द इयर), कु. अमृता देशमुख (बेस्ट स्टूडेंट ऑफ द इयर रनर अप), कु. कोमल पवार, गौरी मगर, ज्ञानेश्वरी अवताडे, भक्ती पवार, आदिती मेटे, वैष्णवी मगर, स्नेहा घोंगणे, मृणाल नाईकनवरे व गौरी कारंडे इंटर कॉलेजीयट टुर्नामेंट टग ऑफ वॉर (प्रथम क्रमांक), कु. कोमल पवार (इंटर कॉलेजीयट १० कि. मी. रोड रेस स्पर्धा (तृतीय क्रमांक), सूक्ष्मजीवशास्त्र विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उत्कृष्ट शोधनिबंध सादरीकरणासाठी कु. अमृता मगर (प्रथम क्रमांक), कु. सोनाली सावंत (व्दितीय क्रमांक) व कु. वैष्णवी माने (तृतीय क्रमांक) पटकावला.

या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना कु. स्वरुपाराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. छाया भिसे, डॉ. अमित घाडगे, प्रा. के. के. कोरे, डॉ. भारती भोसले, डॉ. ऋषी गजभिये, डॉ. राजश्री निंभोरकर, कार्यालय प्रमुख विजय कोळी, श्रीमती सुनीता काटे, रमजान शेख, दिपक शिंदे व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी पालक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

7 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button