माळशिरस येथे ‘आई हॉस्पिटल सोनोग्राफी सेंटर’ व ‘आई मेडिकल’ चा विजयादशमीच्या मुहूर्तावर उद्घाटन समारंभ होणार
उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते तर डॉ. समीर बंडगर, डॉ. दत्तात्रय सर्जे, सौ. ताई वावरे यांची प्रमुख उपस्थिती
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथे ‘आई सोनोग्राफी सेंटर’ व ‘आई मेडिकल’ यांचा उद्घाटन समारंभ विजया दशमीच्या दिवशी शनिवार दि. १२/१०/२०२४ रोजी सकाळी ११ वा. संपन्न होणार आहे. सदर हॉस्पिटलचा शुभारंभ अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. तर यावेळी प्रमुख उपस्थितीत डॉ. समीर बंडगर (बंडगर हॉस्पिटल, अकलूज), डॉ. दत्तात्रय सर्जे (तालुका अध्यक्ष, मेडिकल असोसिएशन माळशिरस), सौ. ताई सचिन वावरे (नगराध्यक्षा, माळशिरस नगरपंचायत) हे असणार आहेत.
सदर हॉस्पिटलमध्ये नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन डिलिव्हरी, सोनोग्राफी, सरकारमान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया (दुर्बिणीद्वारे व टाक्याचे), दुर्बिणीद्वारे गर्भाशयाची शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीचे सर्व आजारांचे उपचार व शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण केंद्र, वारंवार गर्भपात होत असल्यास तपासणी व उपचार, दुर्बिणीद्वारे गर्भाशय, स्त्रीबीज व नलिका तपासणी, आय. यु. आय., स्तनाचे आजार, निदान व उपचार, स्त्रीबीज तपासणी, एन.एस.टी. आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. तालुक्यात वंधत्वावरील समस्यांचे सर्व सोयींनी युक्त असे हॉस्पिटल उपलब्ध झाले आहे.
तरी या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. श्वेता सागर कोळेकर (M.B.B.S., M.S. Obst & Gynea (Kem Hospital, Mumbai), Laproscopy & Infertility Specialist) (स्त्री रोग व प्रसूती तज्ञ), डॉ. सागर नामदेव कोळेकर (M.B.B.S., M.S. Obst & Gynea (Kem Hospital, Mumbai), Laproscopy & Infertility Specialist) (स्त्री रोग व प्रसूती तज्ञ), सौ. ताई व श्री. नामदेव शंकर कोळेकर, सौ. वैशाली व श्री. प्रताप नामदेव कोळेकर, सौ. माया व श्री दिगंबर यशवंत धायगुडे (D. Pharm) व समस्त कोळेकर परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
cdrrn5