धनगर समाजाला कर्जविरहित 85% अनुदान आदिवासी समाजाच्या योजनेंच्या धर्तीवर देण्याचा महायुती शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय…

मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे, मा. देवेंद्रजी फडणवीस आणि मा. अजितदादा पवार या दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे धनगर समाज बांधवांनी मानले आभार..
मुंबई (बारामती झटका)
केंद्रवर्ती अर्थसंकल्पामध्ये धनगर समाजाला वैयक्तिक तसेच कुटुंबासाठी एक लाख रुपयेपर्यंत आणि सामूहिक गट यासाठी दहा लाख रुपये पर्यंत ८५% वैयक्तिक लाभ आणि उर्वरित पंधरा टक्के रक्कम लाभार्थ्याची स्वतःची वर्गणी म्हणून भरण्यात येईल. धनगर समाजाच्या विकास किंवा कल्याणाच्या दृष्टीने ज्या योजना स्थळ कालानुरूप आवश्यक आहेत तसेच ज्या योजनांचा समावेश अर्थसंकल्पामध्ये किंवा केंद्रीय निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये नाही, अशा अभिनव स्वरूपाच्या स्थानिक महत्त्वाच्या योजना तांत्रिक औपचारिकतेमुळे दीर्घ कालावधी करिता अडकून न पडता स्थानिक पातळीवर तातडीने आणि प्रभावीपणे कार्यान्वित करून त्यांचा लाभ गरजू धनगर समाजाला प्रत्यक्ष मिळवून देणे, हा या केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्यूक्लियस बजेट योजनेचा गाभा आहे. त्यासाठी धनगर समाजाच्या विकासाच्या दृष्टीने सुयोग्य अशा विविध कार्यक्रमांना तातडीने कार्यान्वित करण्यासाठी न्यूक्लियस बजेट योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
यासाठी या शासनाने याच कार्यकालात दोन हजार कोटी रुपयांची तरतूद त्वरित मंजूर करण्यात यावी, असे धनगर समाज बांधवांनी तीव्र मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य व गरीब धनगर बांधवांसाठी चांगला निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे विस्थापित समाजास चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यास सहकार्य होणार आहे. त्यामुळे शासनाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. याबाबत धनगर समाजातील संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महायुतीच्या शासनाचे आभार मानले आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.