ताज्या बातम्यासामाजिक

रोटरी क्लब अकलूज आणि जिजाऊ ब्रिगेड माळशिरस तालुका यांच्या वतीने नवदुर्गांचा सन्मान सोहळा संपन्न.

पत्रकारीता क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल सौ. शोभा वाघमोडे यांना सन्मानित.

अकलूज (बारामती झटका)

मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड माळशिरस तालुका व रोटरी क्लब अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभरात अनेक विविध उपक्रम राबवले जातात. त्यातीलच नवरात्र उत्सवानिमित्त सन्मान नवदुर्गांचा हा एक उपक्रम आहे. विविध क्षेत्रात काम करत असणाऱ्या महिलांचा ‘सन्मान नवदुर्गांचा २०२४’ हा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. डॉटर मॉम्स फाउंडेशनच्या अध्यक्षा तसेच शिवरत्न शिक्षण संस्थेच्या चेअरमन सौ. शितलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते गौरव पत्र आणि रोप देऊन महिलांना सन्मानित करण्यात आले.

यामध्ये शोभा तानाजी वाघमोडे (पत्रकार माळशिरस तालुका प्रतिनिधी), निया जबी शरफुद्दीन तांबोळी (आरोग्य सेविका), जयश्री शंकर अटक (सफाई कामगार जिल्हा उप रुग्णालय, नातेपुते), शितल दळवी (व्यावसायिक, अकलूज), विद्या वाघमारे (महिला वकील, जिल्हा उप न्यायालय माळशिरस), कुमारी प्राची बाबर (महिला पोस्टमन), उर्मिला सतीश हरिहर (महाराष्ट्र राज्य परिवहन बस वाहक),
अलका कदम (महाराष्ट्र राज्य, पोलीस हवालदार), मनीषा जाधव (आरोग्य सेविका, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार विजेत्या) या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी शितलदेवी मोहिते पाटील यांनी सर्व नवदुर्गांचे अभिनंदन करून मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक महिला असते तर प्रत्येक यशस्वी महिलेच्या पाठी एक पुरुष नव्हे तर संपूर्ण कुटुंब असतं. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अफाट कष्ट करावे लागते. खूप दिवसांची मेहनत हे आपल्या यशाची किल्ली आहे. कष्टाला पर्याय नाही.

यावेळी सन्मानित नवदुर्गांनीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्षा रो. सौ. प्रिया नागणे, सचिव रो. मनिष गायकवाड, उपाध्यक्ष रो. नवनाथ नागणे, संचालक रो. अजित वीर, रो. कल्पेश पांढरे, रो. केतन बोरावके, रो. हनुमंत सुरवसे, रो. आशिष गांधी, रो. बबनराव शेंडगे, रो. पोपट पाटील, रो. आशा शेख तसेच जिजाऊ ब्रिगेड माळशिरसच्या तालुका अध्यक्षा शिवमती मनोरमा लावंड, जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रांतिक सदस्या शिवमती अक्काताई माने व जिजाऊ ब्रिगेड तालुका माळशिरसचे सर्व सदस्य तसेच रोटरी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिया नागणे यांनी केले तर सूत्रसंचालन सुहास उरवणे यांनी केले व आभार प्रदर्शन मनोरमा लावंड यांनी केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button